Sambhajiraje : आत्ताचे राजकारणी फक्त आपली सोय पाहतात; संभाजीराजेंनी खडसावले

स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकरावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही अजिबात बरोबर नाही आहे. राजकारणी आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी सरकारला सुनावले आहे. आत्ताचे राजकारणी हे आपापल्या सोयीनुसार वागत आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेने ठरवलेलं आहे कि 2024 मध्ये स्वातंत्र्य […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 27T105647.923

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 27T105647.923

स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकरावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही अजिबात बरोबर नाही आहे. राजकारणी आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी सरकारला सुनावले आहे.

आत्ताचे राजकारणी हे आपापल्या सोयीनुसार वागत आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेने ठरवलेलं आहे कि 2024 मध्ये स्वातंत्र्य निवडणूक लढवणार, अशी घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. यावेळी त्यांनी इतर राजकारण्यांवर टीका देखील केली आहे.  आताचे राजकारणी असलेले आमदार, खासदार हे आपापल्या सोयीनुसार वागत आहेत, अशा शब्दात त्यांनी राजकारण्यांवर टीका केली आहे.

पुण्यात खळबळ ! मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणीची मागणी; दोघांविरुद्ध गुन्हा

सुसंस्कृत राजकारण घडविण्यासाठी स्वराज्य संघटना राजकारणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्यावर देखील टीका केली आहे.  आरोग्य मंत्र्यांच्याच मतदार संघातील आरोग्य केंद्रात दुर्गंधी पसरलेली आहे. याकडे  मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री यांचे दुर्लक्ष आहे, असे म्हणत त्यांनी सावंतांना देखील टारगेट केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil : राहुल गांधीची सावरकरांवरची टीका प्रसिद्धीसाठीच, काँग्रेसचे जहाज भरकटलेले

यावेळी त्यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा देखील समाचार घेतला आहे. अब्दुल सत्तार यांनी  शेतकऱ्यांच्या बाबतीत जे विधान केले ते बोलू ही शकत नाही, असे म्हणत त्यांनी सत्तारांवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी स्वराज्य संघटनेच्या आगामी काळातील राजकारणावर भाष्य केले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने  जो पक्ष समविचारी आहे त्यांच्यासोबत आम्ही असू,  असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

Exit mobile version