Pooja Khedkar Case Ramdas Kadam Connection : वादग्रस्त ठरलेल्या IAS अधिकारी पूजा प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालय. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी तत्कालीन मंत्र्याला 2 कोटींची लाच दिली होती, असा गंभीर आरोप या प्रकरणातील तक्रारदार तानाजी गंभीरे यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतल्याचं चित्र आहे. (Pooja Khedkar) गंभीरे यांनी प्रकरणात माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर आरोप केले आहेत. परंतु, हे आरोप होताच माजी मंत्री रामदास कदम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
ही माझी बदनामी मायक्रोसॉफ्ट विंडोज जगभरात डाऊन; संगणक आणि लॅपटॉप पडतोय बंद, विमानसेवाही थांबवली
या प्रकरणावर बोलताना कदम म्हणाले, ‘मी गंभीरे यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेवून कारवाई करणार आहे. बदल्यांचे अधिकार हे महामंडळाचे असतात. यामध्ये माझं नाव आहे. परंतु, 2019 नंतर पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांचं नाव नाही. ही माझी बदनामी आहे. याविरोधात न्यायलयात जाणार आहे. तसंच, माझी एसीबी चौकशी होण्याचा काही संबधच नाही असंही कदम म्हणाले आहेत.
सुभाष देसाई यांचंही नाव
पुढे बोलताना कदम म्हणाले, ‘माझी कारकिर्द 2019 ला संपली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मंत्री केलं. या प्रकरणाचा दिपक केसरकरांचाही कोणता संबंध नाही. ही डील झाली हे त्यांच्या स्वप्नात आलं होतं का? यात माझं नाव आहे, केसरकरांचं नाव आहे, आदित्य ठाकरेंचे नाव नाही म्हणून हे राजकीय आरोप आहेत. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांचं देखील नाव नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्या वकिलांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही कदम यांनी केली आहे.
गंभीरे यांचे आरोप काय? मोठी बातमी! IAS पूजा खेडकर यांच्यावर दुसरी मोठी कारवाई; UPSC कडून गुन्हा दाखल
दिलीप खेडेकर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला असताना त्यांना वेगवेगगळ्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. ते निलंबित होते. त्यानंतरही त्यांना चार्ज देण्यात आला. कुणाचा तरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा अधिकारी इतकं मोठं बेकायदेशीर कृत्य करु शकत नाही, असा दावा गंभीरे यांनी केला आहे.