Download App

‘जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर’.. अजितदादांचा जरांगेंना रोखठोक इशारा

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा पवार यांनी दिला. या मेळाव्यात अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले.

‘काही जणांचं वय 84 झालं तरी थांबेना, अरे थांबा ना!’ अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार  

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. धनगर समाज आरक्षण मागतोय. आदिवासी म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. जे मागास आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

कोरोना काळातही न थांबता काम केलं 

आमची विचारधारा वेगळी होती तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना होता. त्यावेळीही मी सकाळी 8 वाजताच मंत्रालयात जाऊन बसायचो. काही जण म्हणायचे कोरोना आहे. मी म्हणायचो मेलो तरी चालेल पण लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजेत. त्यामुळे आता कोण काय चर्चा करतोय याला जास्त महत्व देत नाही. विकासाला महत्व देतो, असे अजित पवार म्हणाले.

प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंनीच पवारांच घर फोडलं; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका

follow us