पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या आणि सांगा महाराष्ट्र साफ करून द्या; मनसेकडून ‘तो’ व्हिडिओ ट्विट

Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर काल दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात […]

Raj Thackeray: शिंदे-फडणवीस म्हणत होते म्हणून..., अमित शाहंच्या भेटीबद्दल राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Raj Thackeray

Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर काल दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळक (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान यावर आता राज ठाकरेंनी भाष्य केलं. मुंबई पोलिसांना 48 तासांची मोकळी द्या, असं ते म्हणाले.

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाचा भाग 2 येणार का? निर्मात्यांनी दिली हिंट 

राज्यात गेल्या पंधरा दिवसांत गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. कल्याणमध्ये भाजप आमदाराने थेट पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर हल्ला झाला. तर काल अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या सततच्या घटनांमुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज्यात गुंडाराज आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली. तर आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मनसेकडून एक ट्विट करण्यात आलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ मनसेने ट्विट केला. त्यात राज ठाकरे यांनी मुंबई पलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या, असं मत मांडल होतं. तोच व्हिडिओ पुन्हा ट्विट करण्यात आला आहे.

‘रमा राघव’ मालिकेत दुहेरी धमका, सुरू होणार रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा

काय म्हणाले राज ठाकरे?
आपल्या देशात कायदा आहे, म्हणजे लॉ आहे. पण ऑर्डर नाहीये. मला असं वाटतं की, ऑरर्डची गरज आहे. ऑर्डर दिली तरच गोष्टी सुरळीत होऊ शकतात. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे.

मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिसांच्या हातात ४८ तास द्या आणि त्यांना सांगा महाऱाष्ट्र साफ करून द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात. पण, ऑर्डर नसतात. अशा वेळेस रिस्क कोण घेईल? पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जर जेलमध्ये जावं लागत असेल तर ते जेलमध्ये का आणि कोणासाठी जातील? खूर्चीवर बसलेला माणूसच टेम्पररी आहे. त्याच्यासाठी त्यांनी कायमचं जेलमध्ये जायचं, याला काही अर्थ नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्यमंत्री याकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. राज्यात ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत त्यांची आता चौकशी केली जाणार आहे. ही शस्त्रे परवान्यासोबत आहेत की विना परवाना आहेत, याची तपासणी करून चौकशी केली जाईल, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Exit mobile version