‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाचा भाग 2 येणार का? निर्मात्यांनी दिली हिंट

‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाचा भाग 2 येणार का? निर्मात्यांनी दिली हिंट

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) रिलीज झाला आहे. शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनच्या (Kriti Sanon) चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण याला नवा प्रयोग म्हणत आहेत. काहीजण याला रजनीकांत (Rajinikanth) यांच्या ‘रोबोट’ (Robot)चित्रपटाची महिला आवृत्ती असेही म्हणत आहेत.

‘हमारी बहू रजनीकांत’मध्ये ही कल्पना अनेक वर्षांपूर्वी वापरण्यात आल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे. ही मूळ संकल्पना नाही. अनेकांसाठी, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ सिनेमा एक स्वच्छ कौटुंबिक मनोरंजन आहे. काहींसाठी हा एकवेळ पाहणारा चित्रपट आहे.

तसेच जान्हवी कपूरचा देखील चित्रपटात एक कॅमिओ आहे. ती शाहिद कपूरची सहकारी म्हणून कामकर्ट आहे. तसेच चित्रपटाच्या शेवटी लिहिलं आहे, To be continued. त्यामुळे ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा दुसरा भागही देखील येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिक्वेलमध्ये जान्हवी कपूरचीही मोठी भूमिका असणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या मदतीने चित्रपटाची कथा पुढे सरकणार आहे.

‘रमा राघव’ मालिकेत दुहेरी धमका, सुरू होणार रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जान्हवी कपूर या चित्रपटाचा भाग असेल याची कोणालाही देखील कल्पना नव्हती, त्यामुळे ही धक्कादायक बातमी आहे. अलीकडे त्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. सध्या ती वरुण धवनसोबत ‘बेबी जॉन’मध्ये काम करत आहे. ती ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा’मध्येही दिसणार आहे. तसेच तिने सूर्या आणि राम चरण सोबतचे चित्रपटही आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा सीक्वल बनवला तर जान्हवी यात नक्कीच दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube