अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर शिंदे आणि भाजपला सुनावले.
‘खेडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होत की, उद्या शिमगा आहे.शिमग्याला बोंब मारणं साहजिक आहे. त्यामुळे रामदास कदम, गुलाबराव पाटील यांनी मारलेली बोंब आपण समजून घेऊ यापेक्षा जास्त महत्त्व त्यांना दिलं जाऊ नये.’ उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम यांनी टीका केली होती त्यावर असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम, गुलाबराव पाटील यांना लगावला आहे.
खबरदार, बाळासाहेबांबद्दल बोलाल तर.. ‘त्या’ प्रश्नावर आमदार संजय शिरसाट संतापले
खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला आलेली गर्दी ही पैसे देऊन आणली या टीकेवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी स्वतः सर्व माध्यमांना आवाहन केलं होतं की, तुम्ही प्रत्येक रांगेत जाऊन आलेल्या कार्यकर्त्यांना विचारा की गर्दी जमवलेली आहे की आलेली आहे. आमच्या विरोधकांना स्वतः आरशात बोलत आहेत की काय असं वाटत असते असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलंय.
त्याचबरोबर ‘राज्याचे मुख्यमंत्री दर्ग्यामध्ये आरती करतात, आरएसएसवाले जमाते हिंद इस्लामसोबत काम करायचं ठरवतात तेंव्हा त्यांना कोणत्याही समाजाचे लांगुलचालन केल्यासारख वाटत नाही मात्र जेंव्हा उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समाज स्वतःहून पाठींबा देतात तेंव्हा त्यांना लांगुलचालन वैगरे शब्द आठवतात.’ असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.