खबरदार, बाळासाहेबांबद्दल बोलाल तर.. ‘त्या’ प्रश्नावर आमदार संजय शिरसाट संतापले

खबरदार, बाळासाहेबांबद्दल बोलाल तर.. ‘त्या’ प्रश्नावर आमदार संजय शिरसाट संतापले

Sambhajinagar : औरंगाबाद जिल्ह्याच्या (छत्रपती संभाजीनगर) नामांतराच्या मुद्द्यावर सध्या राजकारणाचा पारा चढला आहे. या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी उपोषण केल्यानंतर या वादाला अधिकच हवा मिळाली आहे. ठाकरे-शिंदे गटाचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा जलील यांच्यावर जहरी टीका केली आहे.

वाचा : Sambhajinagar : लग्न मंडपातून नवरदेव पोहोचला औरंगाबादच्या समर्थनार्थ आंदोलनस्थळी

वास्तविक जलील यांनी एक स्टेटमेंट केले होते. त्यात बाळासाहेब कोण (Balasaheb Thackeray), असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर शिंदे गटाचे शिरसाट म्हणाले, की इम्तियाज जलील हे हैदराबादचे असल्याने बाळासाहेब कोण हे कळले नसेल. बाळासाहेब ठाकरे कोण होते असं जगात कुणालाही विचारलं तरी कळलं असतं. पण, या निजामांच्या औलादीला दुसरं काही दिसत नाही. जलील यांनी बाळासाहेबांबद्दल बोलू नये. ते आमचे दैवत आहेत. विरोधात जर शब्द वापरला तरी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, पण मागणी किती जुनी?

जे स्वतःला शिवसेनाप्रमुखांचे वारसदार म्हणवतात त्यांच्या तोंडून मात्र एक शब्दही निघाला नाही. बाळासाहेबांची विचार विकणाऱ्यांची औलाद तयार झाली आहे. त्यांनी हे सगळे विचार धुळीस मिळवले आहेत, अशा शब्दांत शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा रोख माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे होता. शिरसाट यांनी याआधीही या मुद्द्यावर खैरे यांच्यावर टीका केली होती.

दरम्यान, नामांतराच्या मुद्द्यावर आता वाद-विवाद वाढतच चालला आहे. या नामांतराविरोधात एमआयम आक्रमक आहे. फक्त औरंगाबादच नाही तर उस्मानबादचे नाव धाराशिव केल्याचा निर्णयही त्यांना पटलेला दिसत नाही. त्यामुळे या मुद्द्यावरही वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube