Download App

‘हा’ तर शिळ्या कढीला उत देण्याचा प्रकार, अजित पवारांना लंकेंचे प्रत्युत्तर

Nilesh Lanke : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना माढा आणि अहमदनगर लोकसभेवरती

  • Written By: Last Updated:

 Nilesh Lanke On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना माढा आणि अहमदनगर लोकसभेवरती (Nagar Lok Sabha) खळबळजनक वक्तव्य करण्यात आले होते. आता याला अहमदनगरचे खासदार  निलेश लकेंनी  प्रत्युत्तर दिले आहे. नगर आणि माढाबाबत करण्यात आलेलं वक्तव्य म्हणजे शिळ्या कडीला उत देण्याचाच प्रकार आहे अशी टीका खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते निवडणून आले आहे आणि मी देखील आता खासदार झालो, त्यामुळे आता या गोष्टीला काही महत्त्व राहिले नाही, असे लंके यावेळी म्हणाले. अजित पवार यांच्याकडून नगर आणि माढा लोकसभेबाबत करण्यात आलेले वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला उत देण्याचाच प्रकार आहे. तसं धैर्यशील मोहिते पाटील देखील निवडून आले आहे. आता या गोष्टीला काही महत्त्व राहिलेला नाही. असं निलेश लंके म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होतो की, निलेश लंके माझ्याकडून लोकसभा निवडणूक लढवायला तयार होते मात्र लोकसभा मला द्या आणि माझ्या पत्नीला विधानसभा द्या अशी अट माझ्याकडे निलेश लंके यांनी ठेवली होती असं अजित पवार म्हणाले होती.

यानंतर मी भाजपशी याबाबत चर्चा केली होती मात्र याठिकाणी सुजय विखे विद्यमान खासदार असल्याने भाजपने ही जागा सोडली नाही. भाजपसाठी ही जागा धोकादायक आहे असं देखील मी भाजपच्या नेत्यांना सांगितलं होतो मात्र भाजपने ही जागा सोडली नाही असंही अजित पवार म्हणाले होते.

पुन्हा राजकीय भूकंप? छगन भुजबळांनंतर सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे सुजय विखे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा 35 हजार मतांनी पराभव केला होता. सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 686 मतं मिळाली होती तर निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मतं मिळाली होती.

follow us