Download App

विधानसभेच्या तोंडावर महायुतीचं ‘उद्योग’ धोरण; मराठवाड्यात ‘Toyota’ कंपनी करणार मोठी गुंतवणूक

राज्यात जपानच्या एका बड्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुंतवणूक आली आहे.

  • Written By: Last Updated:

Toyota company : महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत असतो. अशातच आता राज्यात जपानच्या एका बड्या कंपनीने (Toyota company) गुंतवणूक केली आहे.  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जपानच्या टोयोटा कंपनीने राज्यात मोठी गुंतवणूक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली आहे.

Budget 2024: जीवन, वैद्यकीय विमा योजनांवरील मागे घ्या; गडकरींची पत्राद्वारे अर्थमंत्र्यांकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर येथे २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक जपानच्या टोयोटा कंपनीने केली आहे. यामुळे ८,००० रोजगार निर्मिती होणार आहे. या गुंतवणुकीमुळे मराठवाड्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणुकीसाठी टोयोटाच्या संपर्कात होते. अखेर आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही यावेळी उपस्थित होते. ऑरिक सिटीमध्ये ८५० एकरमध्ये हा प्रकल्प उभा राहणार आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरचा राज्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय महत्त्वाचा असून महाराष्ट्र राज्य हे गुंतवणूकदारांसाठी पसंतीचं ठिकाण असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, १६,००० लोकांना सहायक युनिटमध्ये रोजगार मिळेल, त्यामुळे एकूण २४,००० नोकऱ्या निर्माण होतील. युनिट दर वर्षी सुमारे चार लाख वाहने तयार करेल आणि तीन वर्षांत उत्पादन सुरू करेल.

अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमिती बैठकीत राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1818547722393096418

follow us

संबंधित बातम्या