UBT issues defamation notice to Neelam Gorhe : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा बद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची नीलम गोर्हे यांना ॲड. असीम सरोदे यांच्यातर्फे अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
खुशखबर! सरकारी कर्मचारी मालामाल होणार; DA थेट 53 टक्क्यांवर, ‘या’ 7 महिन्यांचा सुद्धा पगार मिळणार
यामध्ये म्हटलं आहे की, 23 जानेवारीला दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निलम गोऱ्हे यांनी केलेल्या भाषणामध्ये शिवसेना (यूबीटी) आणि त्यांचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याविरुद्ध काही विधानं केली. त्यामुळे पक्षाची बदनामी झाली. केलेल्या बदनामीकारक विधानाबाबत ही नोटीस पाठवण्यात येत आहे.
MG Hector वर तब्बल 2.40 लाखांचा डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
त्यामुळे तुम्ही केलेल्या वक्तव्यानुसार जर ठाकरेंची शिवसेना ही एका पदाच्या बदल्यात मर्सिडीज कार मागत असेल तर उद्धव ठाकरे ठाकरे यांना तुम्ही किती मर्सिडीज कार भेट दिल्या आणि त्या कार कुठे आहे? त्यांची आरटीओ नोंदणी ची माहिती द्या तसेच तुम्ही हे विधान मागे घ्या. त्याचबरोबर याबद्दल सार्वजनिक माफी मागा अन्यथा तुम्ही बोललेल्या विधानांबाबत पुरावे द्या यापैकी कोणतीही गोष्ट करण्यास तुम्ही यशस्वी झाल्यास तुमचे बाबत आवरून नुकसानीचा खटला दाखल करण्याचे पुढील कारवाई होऊ शकते. यावर तुम्ही चार दिवसात उत्तर देणे अपेक्षित आहे.
काय म्हणाल्या होत्या निलम गोऱ्हे?
नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं काहीच कारण नाही. नव्या मॅनेजरचा गल्ला गोळा करण्याचा प्रयत्न तेव्हापासून सुरू होता का असा प्रश्न गोऱ्हेंना विचारण्यात आला. यावर गोऱ्हे म्हणाल्या, कार्यकर्त्याला कमी समजण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचे नियोजन करत होते.
आता जास्त तपशीलात जाणार नाही. उद्धव ठाकरे गटाचे फार लोकही समोर नाहीत. त्यामुळे त्यांच्या गटाचे लोक येथे असते तर मला बोललेले अधिक आवडले असते. नेत्यांना संपर्क नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो आहोत असे समजावे. दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते असा गौप्यस्फोट डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.