Download App

Uday Samant : राऊतांचे विधान हे संपूर्ण महाराष्ट्राला लाजवणारे आहे

मुंबई :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. यावरुन शिंदे गट व भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्याने राऊतांचे दुकान बंद झाल आहे. त्यामुळे राऊतांची चिडचिड होते आहे व त्यामुळेच राऊत अशी विधाने करत आहेत, अशी टीका उदय सामंत यांनी राऊतांवर केली आहे.

विधीमंडळ हे महाराष्ट्र राज्याचे पवित्र असे स्थान आहे. त्याला चोरमंडळ म्हणणे हा समस्त महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे, असे सामंत म्हणाले आहेत. तसेच राऊत यांनी विधीमंडळाविषयी जे विधान केले आहे, त्या विधानाला राऊतांचे सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचा पाठिंबा आहे का? ते जाहीर करावे, असे म्हणत सामंतांनी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला देखील सुनावले आहे.

(Shahajibapu Patil : संजय राऊत हे कुणाचे हस्तक ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती)

राऊत यांना विधीमंडळाच्या 41 लोकांनी मतदान करुन राज्यसभेत निवडूण पाठवले आहे आणि आता ते याच विधीमंडळाला चोरमंडळ म्हणत आहेत, ही शरमेची बाब आहे. तसेच आम्हाला जर गद्दारी करायची असती तर आम्ही त्यांना निवडूण पाठवलेच नसते, इथेच मुंबईत पत्रकार परिषद घ्यायला ठेवले असते, असा टोला सामंतांनी त्यांना लगावला.

एखाद्याची सत्ता गेल्यानंतर कशी चिडचिड होते हे गेली सहा महिने महाराष्ट्र पाहत आहे. त्यांचे दुकान बंद झाल्याने ते असे बोलत आहेत. त्यांनी आमच्यावर टीका करावी, त्यांनी केलेली टीका ही आम्ही गेली सहा महिने ऐकून घेत आहोत. परंतु राऊतांंनी आज केलेले विधान हे संपूर्ण महाराष्ट्राला लाजवणारी आहे व लोकशाहीची थट्टा करणारी आहे, असे सामंत म्हणाले .

दरम्यान संजय राऊत यांनी आज बोलताना विधीमंडळाला चोरमंडळ असे म्हटले आहे. यावरुन विधानसभेत देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राऊतांवर हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे.

 

Tags

follow us