Uday Samant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच दावोस दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री हे दावोसला 50 लोक घेऊन गेलेत, ते फक्त जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला होता. दरम्यान, आता दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दौऱ्याचा खर्च मांडत आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली.
Ayodhya Ram Mandir : रामललाच्या मूर्तीचा रंग सावळा का? जाणून घ्या त्यामागचं कारण
आज माध्यमांशी बोलतांना सामंत म्हणाले, दोवोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2024 मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत गेलो होतो. हा दौरा यशस्वी झाला. या दौऱ्यादरम्यान 3 लाख 72 हजार सामंजस्य करार करण्यात आले. प्रत्येक व्यवहार करताना संबंधित कंपन्यांचे संचालक तेथे उपस्थित होते. आम्ही आणखी एक कोटी रुपयांचा करार करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. अनेक कंपन्यांना आम्ही दावोसला जाण्यापूर्वीच जागा दिलेलाी आहे. नुसते आश्वासन देण्यसााटी किंवा थंड हवेसाठी आम्ही गेलो नाही. मात्र, काही लोक थंड हवेच्या ठिकाणी जाऊ न शकल्याने त्यांना पोटशुळ उठला आहे, असा हल्लाबोल सामंत यांनी केला.
अहमदनगर जिल्ह्यात 2 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
सामंतांनी खर्च मांडला
दावोस दौऱ्यातील पॅव्हेलियनचं भाडं 4 कोटी 72 लाख रुपये इतके आहे. राज्याच्या शिष्ट मंडळाचा प्रवास व विमा 74 लाख रुपयांचा आहे. याशिवाय इतर खर्चही त्यांनी मांडला.
निवास्थान 2 कोटी 86 लाख
वाहन खर्च 1 कोटी 74 हजार आहे
आदरतिथ्य जेवण 1 कोटी 23 लाख
सुरक्षा रक्षक 29 लाख 76 हजार
छायाचित्रकार 18 लाख 86 हजार
दैनिक भत्ता 3 लाख 80 हजार
पब्लिक सिटी एजन्सी 1 कोटी
बॅनर 6 लाख 78 हजार
फर्निचर 12 लाख 96 हजार
भेटवस्तू गणपतीची मूर्ती 2 कोटी 6
प्रवेशपत्र 58 हजार
एकूण खर्च -17 कोटी 90 लाख 56 हजार 269 रुपये.
सामंत म्हणाले, MMRDA मधील पाच अथवा इतर व्यक्ती स्वत:च्या खर्चाने दावोसला आले होते. यावेळी कटाक्षाने शासनाचे पैसे वाचले पाहिजे ह्या सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडून होत्या. जे करार झाले त्याचा पुरावा दिला आहे. कुठली कंपनी कितीची गुंतवणूक केली? किती रोजगार? हा सर्व खर्च दिलेला आहे. महाप्रति, MMRDA आणि एमआयडीसा एकूण 23 कोटी खर्च आला. त्यामुळं 40 कोटी खर्च आला, असं सांगण हे विरोधकांचा नैराश्य आहे, असं सामंत म्हणाले.
शिष्टमंडळ 13 लोकांचं
शिष्टमंडळ 13 लोकांचं होतं. दावोस दौऱ्यावर गेलेल्या खासदारांना लोकसभेने विशेष अधिकार दिले होते. तसेच अन्यजण जे स्वत:च्या खर्चाने गेले, त्यांच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. कोण कोण मुख्यमंत्र्यांना भेटले याचे फोटोही दिलेत. काही लोक आता मुख्यमंत्री शिंदे यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत, असंही सामंत म्हणाले.