Ayodhya Ram Mandir : रामललाच्या मूर्तीचा रंग सावळा का? जाणून घ्या त्यामागचं कारण

Ayodhya Ram Mandir : रामललाच्या मूर्तीचा रंग सावळा का? जाणून घ्या त्यामागचं कारण

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir Pran Pratishta) तयारी पूर्ण झाली आहे. येत्या 22 जानेवारीला एका शुभ मुहूर्तावर रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी प्रभू रामाच्या मूर्तीचे एक चित्र समोर आले होते. या फोटोतील मूर्ती सावळ्या दगडापासून बनवलेल्या बालस्वरूपात दिसतात. रामललाची मूर्ती (Ram Mandir) काळ्या किंवा सावळ्या रंगात का आहे, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे.

रामललाची मूर्ती सावळी का असते?
रामललाची मूर्ती दगडाची आहे. या सावळ्या दगडाला कृष्ण शिला असेही म्हणतात. त्यामुळे रामललाची मूर्तीही गडद रंगाची आहे. ज्या दगडातून रामललाची मूर्ती बनवली जाते त्यात अनेक गुण आहेत. तो दगड अनेक अर्थांनी विशेष आहे.

Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत नेमकी काय चर्चा?

मूर्तींसाठी वापरलेल्या दगडांचे काय वैशिष्टे?
रामललाच्या मूर्ती तयार करण्यासाठी हा दगड वापरण्यामागील एक कारण म्हणजे रामललाचा जेव्हा दुधाने अभिषेक केला जातो तेव्हा दगडामुळे दुधाच्या गुणवत्तेत कोणताही बदल होणार नाही. त्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसेच हजार वर्षांहून अधिक काळ त्या मूर्ती अशाच राहू शकतात. म्हणजे त्यात कोणताही बदल होणार नाही.

वाल्मिकी रामायणातही वर्णन
याशिवाय वाल्मिकी रामायणात भगवान रामाचा उल्लेख सावळ्या रंगातील केला आहे. त्यामुळे रामललाच्या मूर्तीचा रंग सावळा असण्याचे हे देखील एक कारण आहे. तसेच रामललाची पूजा सावळ्या रूपातच केली जाते.

Ayodhya : प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या ‘बातम्यांबाबत’ काळजी घ्या… मोदी सरकारची तंबी!

भगवान श्रीरामाची मूर्ती कशी आहे?
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, भगवान श्री रामलला यांची मूर्ती पाच वर्षांच्या बालकाच्या रूपात आहे. त्यांनी सांगितले की, मूर्ती 51 इंच उंच असून रामललाची मूर्ती सावळ्या दगडाची आहे. रामललाची मूर्तीतून अनेक देवाचे अवतार दर्शवते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज