Download App

VIDEO : पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे एकाच फ्रेममध्ये, ठाकरेंनी बाजूला बसणं टाळलं, शिंदेच्या ‘त्या’ कृतीची चर्चा

विधानभवनात झालेल्या फोटोसेशवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये होते. मात्र, त्यांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray-Eknath Shinde : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा कार्यकाळ आज संपला आहे. त्यांचे हे या टर्ममधील शेवटचे अधिवेशन असल्याने आज त्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar), विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar), आणि इतर मंत्री तसेच उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) अन्य नेते उपस्थित होते. या समारंभानंतर झालेल्या फोटोसेशवेळी ठाकरे आणि शिंदे एकाच फ्रेममध्ये होते. मात्र, त्यांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारची मान्यता 

दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आयोजित फोटोसेशनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि सभापती राम शिंदे यांच्यामध्ये बसले होते. त्यानंतर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे तिथे पोहोचले. ते येताच सर्व नेते उभे राहिले. दरम्यान, उद्धव ठाकरे कोणत्या खुर्चीवर बसणार असा प्रश्न निर्माण झाला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरून आपल्या खुर्चीकडे जात होते. त्यावेळी नार्वेकर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या बाजूच्या खुर्चीत उद्धव ठाकरे यांनी बसण्यास सुचवलं. मात्र ठाकरेंनी तुम्ही बसा… मी प्रोटोकॉल नुसार मी बसतो बाजूला, असं म्हणत ते दोघांसमोरून पुढे गेले.

ते नक्कल करताहेत, हातात रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही; शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका 

त्यानंतर थोडं पुढं गेल्यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना क्रॉस झाले. ठाकरे समोर येताच शिंदे आपला चष्मा व्यवस्थित करत होते आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्याकडे पाहणं टाळलं. यावेळी एकनाथ शिंदेंच्या बाजूला नीलम गोऱ्या बसल्या होत्या. त्यांनी आपली खुर्ची सोडत उद्धव ठाकरेंना तुम्ही इथे बस असं सांगितलं. मात्र ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंच्या खुर्चीवर न बसता ते शेजारील खुर्जीवर बसले.

दरम्यान, मागील तीन वर्षांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि शिंदे हे अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने एकाच फोटोत एकत्र दिसले. हे दोन्ही नेते एकाच फोटोत आले. मात्र, त्यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. तर उपसभापती नीलम गोऱ्हे आणि ठाकरे यांच्यात संवाद झाल्याचं फोटोशेनवेळी पाहायला मिळालं.

follow us