ते नक्कल करताहेत, हातात रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही; शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका

ते नक्कल करताहेत, हातात रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही; शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) एक मुलाखत घेतली. या मुलाखतीचा एक टीझर समोर आलाय. यामध्ये ठाकरेंनी विविध मुद्द्यांवरून महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ज्यांना विधानसभेत वीस आमदार निवडणूक आणता आले नाहीत, ते बाळासाहेबांची नक्कल करत आहेत, असा टीका कदम यांनी केली.

सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली ‘अवकारीका’ चित्रपटाची टीम, यशासाठी घातले गणरायाला साकडे 

तसेच हाताता रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ठाकरेंच्या टीझर विषयी विचारले असता ते म्हणाले की, चांगलं आहे, राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत आहे… ही मुलाखत उंदराला मांजर साक्ष या पठडीतील आहे. ज्या लोकांना विधानसभेत २० आमदार निवडून आणता आले नाहीत, ते बाळासाहेबांची नक्कल करत आहे. हातात रुद्राक्ष बांधले म्हणून कुणाला बाळासाहेब होता येत नाही, हे उद्धव ठाकरेंना समजले पाहिजे. आम्ही त्यांच्या मुलाखतीची वाट पाहत आहोत. त्यांनी केलेल्या टीकेला व्याजासकट प्रत्युत्तर दिलं जाईल, असं कदम म्हणाले.

राजश्री एंटरटेन्मेंटच्या ‘पाणी’ ने 25 पुरस्कारांवर उमटवली मोहोर; ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट 

पुढं बोलताना कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कच्या सभांमधील कदमांची भाषणे बंद का केली? माझी आणि दिवाकर रावते यांची आमदारकी का घालवली? हे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगावं. उद्धव यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाा आणि पक्षाशी काहीही संबंध नसलेल्यांना मंत्रिपदे दिली. मनोहर जोशींना शिवाजी पार्कच्या सभेतून स्टेजवरून खाली जाण्यास भाग पाडले. तीच यंत्रणा रंगशारदा हॉलमध्ये माझ्या बाबतीतही राबवण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मला भाई तुम्ही येऊ नका, असं सांगितलं होतं, असंही कदम म्हणाले.

दरम्यान, रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला आता ठाकरे गट काय प्रत्युत्तर देतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

मुलाखत कधी प्रसिध्द होणार…
ठाकरेंची संजय राऊतांनी घेतलेली मुखाखत 19आणि 20 जुलैला दोन भागात प्रसिध्द होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेयांच्यासोबत युतीवरही त्यांनी सकारात्मकता दाखवली. सध्या माझा भाऊ माझ्या सोबत आहे. राज ठाकरे माझ्यासोबत आहे. त्यामुळं कुणाला अस्वस्थ व्हायचे कारण नाही, असं ते म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube