सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली ‘अवकारीका’ चित्रपटाची टीम, यशासाठी घातले गणरायाला साकडे

सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली ‘अवकारीका’ चित्रपटाची टीम, यशासाठी घातले गणरायाला साकडे

Avkarika Movie : रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत ‘अवकारीका’ (Avkarika) हा चित्रपट 1 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता विराट मडके याची मध्यवर्ती भूमिका आहे. या चित्रपटाला यश मिळावे यासाठी चित्रपटाच्या टीमने श्री सिद्धिविनायक (Shri Siddhivinayak) चरणी दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळी दिग्दर्शक अरविंद भोसले (Arvind Bhosale) , निर्माते अभिनेता विराट मडके(Virat Madke), रोहित पवार (Rohit Pawar) आदी मंडळी उपस्थित होती.

स्वच्छतादूत हा कष्टकरी वर्ग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत कष्ट उपसत असतात. या लोकांच्या संघर्षाकडे आपण कायम दुलर्क्ष करतो. यांच्या जीवनात आर्थिक सुरक्षितता, सामाजिक कलह, आरोग्य समस्या अशा अनेक आव्हानांचा डोंगर उभा ठाकलेला असतो. याच गोष्टींकडे लक्ष वेधून घेत सत्या नावाच्या सफाई कामगाराची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.

राजश्री एंटरटेन्मेंटच्या ‘पाणी’ ने 25 पुरस्कारांवर उमटवली मोहोर; ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट

या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.

‘War 2’ चा नवीन पोस्टर प्रदर्शित; 30 दिवसांचा काउंटडाउन सुरू 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube