शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारची मान्यता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारची मान्यता

PM Dhan Dhanya Krishi Yojana : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Krishi Yojana) मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 24 हजार कोटी रुपायांच्या कृषी सुधारणा 100 जिल्ह्यांमध्ये करणार आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने एनटीपीसीला (NTPS) नवीकरणीय ऊर्जेमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास देखील केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले की, पीएम धन-धान्य कृषी योजनाचे उद्दिष्ट कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरण आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे, कापनीनंतर साठवणूक क्षमता वाढवणे, सिंचन सुविधा सुधारणे आणि कर्जाची उपलब्धता सुलभ करणे हे आहे.

‘पीएम धन धान्य कृषी योजना’ खास वैशिष्ट्ये

100 जिल्हे कृषी जिल्हा म्हणून विकसित केले जातील.

शेतीच्या प्रमाणात मागे असलेल्या 100 जिल्हे (प्रत्येक राज्यातील किमान एक जिल्हा) विकसित केले जातील.

11 मंत्रालयांच्या 36 योजना येथे एकात्मिक पद्धतीने राबविल्या जातील.

हा 6 वर्षांचा कार्यक्रम आहे.

दरवर्षी 24000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हे सिंचन सुविधा विकसित करण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आहे.

कापणीनंतर साठवणूक आणि कर्जाची उपलब्धता वाढवायची आहे.

एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक करू शकेल

नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (सीपीएसई) लागू असलेल्या विद्यमान गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांमधून एनएलसी इंडिया लिमिटेडला विशेष सूट देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली ‘अवकारीका’ चित्रपटाची टीम, यशासाठी घातले गणरायाला साकडे

अश्विनी वैष्णव म्हणाले की या निर्णयामुळे एनएलसीआयएल त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी, एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेडमध्ये 7000 कोटी रुपये गुंतवू शकेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube