राज्यात भाषावाद अन् केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महायुतीला मिळणार दिलासा?

Chandrashekhar Bawankule : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाषावादावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक महायुती सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. हिंदी सक्तीवरुन मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मराठीवर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुती सरकारवर विरोधक चारही बाजूने टीका करत आहे.
तर आज मीरा- भाईंदरमध्ये (Mira-Bhayander) ठाकरे गट आणि मनसेकडून मराठीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मराठीवर विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकार (Mahayuti Government) बॅकफूट गेली आहे. मात्र आता सरकारला दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माहिती दिली आहे.
मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीनं घेण्यात आला असल्याची माहिती भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की, मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने माय मराठीचा अगोदरच गौरव केला आहे.
समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की, मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने माय…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 8, 2025
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात करण्यात येणाऱ्या या क्रांतिकारी बदलाचा प्रत्येक मराठी भाषिक आनंदाने स्वागत करतो आहे. पंतप्रधान आदरणीय मोदीजी व केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह भाई यांचे मनःपूर्वक आभार! असं राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; असंख्य पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश