Uddhav Thackeray : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील एका फोटोने राजकारणात गदारोळ उठला आहे. विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असताना आता सामनातूनही ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) टीकेचे बाण सोडले आहेत. भाजपाचे कुळे यांची मुळे मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपाचे दुधखुळे करत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवू धमक्या वगैरे दिल्या जात आहेत. पण भाऊ एक मात्र नक्की, या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा मकाऊछाप जुगार करून राज्य बदनाम केले. कुळे येतील, कुळे जातील. त्यांच्या समर्थनार्थ झांजा वाजवणाऱ्यांनो जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती! महाराष्ट्रात आता एक जुगार बचावो मंत्रालय सुरू तर होणार नाही ना? असा खोचक सवाल करत भाजपाच्या अमृतकाळात काहीही घडू शकते असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Raj Thackeray : राज ठाकरेंचा आदेश! ‘त्या’ वादात पडू नका; निवडणुकीची तयारी सुरू करा
गेल्या आठ दहा वर्षात भारतीय राजकारणाच गजकर्ण झाले आहे व गजकर्णाचा हा मूळ किडा भाजपचे राज्य देशात आल्यापासून वळवळू लागला आहे. राजकारणाच स्तर किती घसरला हे पहायचे असेल तर सध्या पाच राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांतील भाषणे समजून घ्यायला हवीत. इतरांचे ठीक आहे पण पंतप्रधान आणि गृहमंत्री पदांवरील व्यक्तीने तरी संयमाने आणि भान राखून बोलायला हवे. राजकीय विरोधकांवर घसरायचे म्हणजे किती घसरायचे. एकंदरीतरच सध्याच्या राजकारणात एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे अशी गत झाली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे महाशय उद्धव ठाकरे, शरद पवारांपासून अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलतात व असे बोलणे ही एक विकृती आहे असे देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना वाटत नाही. त्याच बावनकुळ्यांचा एक बावनपत्ती फोटो समाजमाध्यमांवर झळकताच भाजपाच्या गोटात छाती पिटण्याचा हुकमी कार्यक्रम सुरू झाला. तो अद्याप संपलेला नाही, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.
Uddhav Thackeray : महागाई वाढणार, मग त्यात विशेष काय? उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल
नेपाळी बेडकाला सोडण्याचे काय कारण ?
कुळे हे त्यांच्या कुटुंबासोबत कुठे असावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. पण कुळे हे मकाऊच्या एका हॉटेलातील कॅसिनोत मस्त बसून द्युत खेळात दंग असल्याचे हे छायाचित्र मनोरंजक आहे. कुळे यांच्या टेबलवर पोकर्स नावाच्या जुगारात खेळले जाणारे चलन विखुरले आहे. व त्यांना त्यांच्या चिनी मार्गदर्शक कुटुंबाने घेरले आहे. कुळे यांनी त्या खेळात त्या क्षणी किती आकडा लावला आहे तो त्यांच्या टेबलावरील स्क्रिनवर झळकला आहे. हे छायाचित्र प्रसिद्ध होताच भाजपास इतके हडबडून जायचे कारण नव्हते.
छे छे! आमचे प्रदेशाध्यक्ष बसले आहेत तो जुगाराचा अड्डा नव्हेच. ते तर त्यांच्या कुटुंबासह मकाऊ नगरीत पर्यटनास व श्रमपरिहारास गेले आहेत. त्यानंतर कुळे यांनी स्वतः केलेला खुलासा तर बुडत्याचा पाय खोलात अशा पद्धतीचा आहे. छे, छे! माझा आणि त्या जुगाराच्या हॉटेलचा काहीच संबंध नाही. मी तर ते एक रेस्टॉरंट समजून खाण्यापिण्यासाठी गेलो. त्या छायाचित्रातचा इतका धसका घेण्याचे व त्यानंतर आव्हान प्रतिआव्हान देण्यासाठी नेपाळी बेडकांना सोडण्याचे काय कारण, असा तिखट सवाल या लेखात लेखात ठाकरे गटाने केला आहे.