Download App

शिवसेना फोडणाऱ्या नालायकांसोबत जाणार नाही, ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Uddhav Thackeray On Modi : आज शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray On Modi : आज शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडत आपण एनडीए सोबत जाणार की नाही याबाबत देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपला पहिला जाहीर कार्यक्रम होत आहे. निवडणुकीत ज्या देशभक्तांनी शिवसेनेला मतदान केलं त्यांचा आभार. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, दलित सर्व आहे. जर आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा तुम्हालाला कोणी रोखू शकत नाही मात्र आत्मविश्वास आणि अहंकार देखील फरक आहे. अहंकार जो मोदींमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) तडाखा बसला आहे त्यामुळे ते गैरसमज निर्माण करत उद्धव ठाकरे पुन्हा मोदींसोबत (PM Modi) जाणार असा प्रचार करत आहे मात्र ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत जाणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच एनडीए सरकार चालणार की नाही हे माहिती नाही पण सरकार पडलंच पाहिजे असं माझं मत आहे.

निवडणुकीनंतर अनेक जण शिवसेनेला हिंदू मत मिळाली नाही त्यांना मुस्लिम मत मिळाली आहे असा प्रचार करत आहे, होय, आम्हाला सर्व देशभक्तांनी मतदान केले आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला तर नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आहे. 2014 आणि 2019 चा फोटो त्यांच्या सरकारचा पाहा आणि आताचा सरकार पहा. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हिंदुत्वादी आहे का? असा सवाल विचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. मुस्लिमांना माहिती आहे शिवसेना समोरून वार करते आम्ही पाठीमागून वार करणारे नाही असं देखील ठाकरे म्हणाले.

आज भाजपने हिंदू विरोधात असणाऱ्या लोकांना सत्तेत घेतले आहे असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले. तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व का सोडले ? याचा उत्तर मोदींनी द्यावा असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

दिलासादायक बातमी! आता ‘या’ लोकांनाही मिळणार मोफत उपचार; सरकारकडून आदेश जारी

follow us