दिलासादायक बातमी! आता ‘या’ लोकांनाही मिळणार मोफत उपचार; सरकारकडून आदेश जारी

दिलासादायक बातमी! आता ‘या’ लोकांनाही मिळणार मोफत उपचार; सरकारकडून आदेश जारी

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या वर्षी मोठी घोषणा करत महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) लाभ देण्याचे जाहीर केले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारकडून याची तयारी सुरू करण्यात आली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना (White Ration Card Holders) देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. याच बरोबर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana) देखील लाभ त्यांना घेता येणार आहे.

सरकारकडून पांढरे रेशन कार्ड आधार कार्डसोबत संलग्न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याची सूचना देखील देण्यात आले आहे.

2019 मध्ये आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून राज्यात एकत्रितपणेराबविण्याचा निणर्य सार्वजनिक विभागाकडून घेण्यात आला होता. मात्र 2023 मध्ये त्यामध्ये सुधारणा करून या योजेनचा लाभ पांढरे रेशन कार्ड धारकांना देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता सरकारकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.

1.50 लाखांची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मिळतोय 40 हजारांचा डिस्काउंट

या योजनेनुसार आता राज्यातील सरकारी आणि खाजगी रुग्णलयात योजनेशी संबंधित सर्व नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. मात्र यासाठी रेशन कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. पांढरे रेशन कार्ड आधार नंबरशी संलग्न करण्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात यावी असे आदेश देखील सरकारकडून देण्यात आले आहे.

शिंदे सरकारच्या अडचणीत होणार वाढ? 127 मतदारसंघात मनोज जरांगेंचे सर्व्हे पूर्ण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube