मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली (Lok Sabha Election 2024) आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठापना झाल्यांनतर (Ayodhya Ram Mandir) आता लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही पक्षांसमोर निवडणूक चिन्हाचे संकट उभे राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा वाद विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे तर उद्धव ठाकरे गटाला चिन्ह मिळाले आहे. मात्र चिन्हाचा वाद पुन्हा कोर्टात गेला असल्याने त्यांचीही कोंडी होणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही गटांची वाटचाल अडचणीची होणार आहे.
लोकसभा निवडणूक जवळ आली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होणे बाकी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे ही सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेप्रमाणे निकाल लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अशावेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला नवीन चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. जर हा निकाल जसजसा लांबेल तसतसा शरद पवार गटाला नवीन चिन्ह जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कमी वेळ मिळेल. हे शरद पवार गटासाठी चिंतेचा विषय आहे.
Sharad Pawar अन् अजित पवार आज एका व्यासपीठावर; अजितदादा पुन्हा एकत्र येणं टाळणार?
दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने (Election Commission) मशाल चिन्ह दिले आहे. या चिन्हावर आता जनता दलाने मशाल आमचे चिन्ह आहे असा दावा केला. हा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला असला तरी जनता दलाने पुन्हा याचिका टाकली आहे. जर ऐन निवडणुकीच्या काळात हा वाद पुन्हा निवडणूक आयोगाने चौकशीस घेतला तर ठाकरे गटाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
लोकसभा निवडणुकीत नवीन चिन्ह जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि ठाकरे गटांना संघर्ष करावा लागणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे सुरू आहे. या सुनावणीत शिवसेनेच्या धर्तीवर निकाल झाला तर चिन्ह अजित पवार गटाला मिळेल हे नक्की, अशा परिस्थितीत पवार गटाला ऐन निवडणुकीत नव्या चिन्हासह निवडणुकीला सामोरे जावे लागेल हेही नक्की
‘अण्णा, तुमचं आंदोलन आम्हाला परवडणार नाही’ CM शिंदेंचा फोन, अण्णांचीही हसून दाद