Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान, वायकरांच्या पक्षप्रवेशावर आता उद्धव ठाकरेंनी त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली.
बजरंग पुनिया आणि रवी दहियांचे ऑलम्पिकचे स्वप्न भंगले, पात्रता फेरीतच पराभव
उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात बोलतांना वायकरांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, आजही काहीजण निघून जात आहेत. जाऊ द्या.ज्याला कोणाला वाटत असेल इकडचा खडा तिकडं केला तर परिणाम होईल. मात्र, काल जी गर्दी होती, ती आजही आहे. मोठी झाली, ती लोकं गेली, मात्र, मोठे करणारे इथेच आहे, असं ठाकरे म्हणाले.
बुडत्याचे पाय डोहाकडे, फडणवीसांमुळेचं मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
ते म्हणाले, मी तुम्हाला काल सांगितलं, मी काल काल जोगेश्वरी शाखेच्या भेटीत एक प्रश्न विचारला होता, तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्षे होऊन गेली. पण साडेतीनशे वर्षांनंतरही आपण खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, अण्णाजी पंत यांची नावं घेतल्यानंतर त्यांना काय म्हणतो? ते साडेतीनशे वर्षानंतरही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसू शकले नाहीत, तर आज जे गद्दारी करत आहे, त्यांना पुसायला किती जन्म घ्यावे लागतील, अशी टीका ठाकरेंनी केली.
ठाकरे म्हणाले, प्रत्येकानं ठरवायचं आहे की, मी खंडोजी खोपडेची अवलाद आहे की, तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी यांचा मी वंशज आहे… जे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळची औलाद आहेत, तिकडे मिंधे बसलाय, जा त्याच्या दाढीखाली… कारण तोही तीच औलाद आहे, गद्दार म्हटल्यावर गद्दारच, असा घणाघात ठाकरेंनी केला.
भाजपने शिवसेनेच्या झेंड्याला डाग लावला
ही लढाई देशभक्त आणि द्वेषभक्त अशी आहे. हुकूमशाही गाडण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत.भाजपने शिवसेनेच्या झेंड्याला डाग लावण्याचं काम केलं. त्यांच्यावर हा खरा भगवा फडकवण्याचे काम मला करायचे आहे. निष्ठावंतांना हार कधीच कळत नाही. मूठभर मावळेच एकनिष्ठ असतात, असं ठाकरे म्हणाले.