Udhav Thackeray News : मर्दाची अवलाद असाल तर तुम्ही यंत्रणा बाजूला ठेऊन मैदानात या, असं खुलं चॅलेंजच माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे. दरम्यान, विदर्भ दौऱ्यादरम्यान, अमरावातीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.
गिलगिट-बाल्टिस्तान भारतातच, ट्विटरने काश्मीरमध्ये लोकेशन दाखून पाकिस्तानला दिला मोठा झटका
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशात केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना फोडण्यासाठी केला जात आहे. तुम्ही जर मर्दाची औलाद असाल तर यंत्रणा बाजूला ठेऊन मैदानात या, सत्ताधाऱ्यांना देशाचं काय आहे ते विकून टाकायचं आणि दुसऱ्याचा पक्ष चोरायचा, वर म्हणायंच की जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. विरोधकांना सत्तेची मस्ती आली असून विरोधक ठेवायचाच नसल्याचा धोरण भाजपकडून राबवण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
शिंदेंची उपयुक्तता संपली; मुख्यमंत्रीपदी अजितदादांची वर्णी लागेल! पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
तसेच विदर्भ दौऱ्यादरम्यान अनेक कट्टर शिवसैनिक येताहेत, हे भाग्य खुर्चीत बसलेल्या माणसाचं नसतं. मी कोणाचीही घरं फोडलेली नाहीत. सत्ताधारी घरं फोडणारे आहेत. मी घरी बसून जे काम केलं आहेत ते कामं सत्ताधाऱ्यांना घरं फोडूनही करता येत नाहीत. त्यांना शासन आपल्या दारीच्या माध्यमातून काम करावं लागतंय, ज्या पैशांतून आमदार विकत घेत आहेत त्याचं पैशांतून माणसं वाचवा, माणसांचे आशिर्वाद घेतले तर तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरजच पडणार नाही, मी घरी बसलो होतो तरी माझं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा, ताफा थांबवून रुग्णाला मदत
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी अमरावतीतले काही बोगस लोकं म्हणतात, की मी मतांची भीक मागायला आलोय, मी मतांची भीकच मागायला आलोय
कारण मी मतदाराला राजा मानतो, बोगस प्रमाणपत्रावर पैसे देऊन मी गुलाम मानत नाही,कदाचित त्यांना आता ही गर्दी पाहुन सलाईन लावण्याची वेळ आली असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
आजचा हा दौरा नाही तर भेट आहे, कट्टर शिवसैनिकांची ही भेट आहे, माझ्या मनातली कल्पना मला साकारता येणार नाही, आता पक्ष, चिन्ह चोरलायं तर आता काही होऊ शकत नाही असं त्यांना वाटतंय पण आजची गर्दी पाहुन माझ्यासाठी कित्येक तास वाट पाहणाऱ्यांना देव नाहीतर काय मानू
स्वागताला या पण गर्दी मशाल ठेवू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे.