Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(udhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘याला म्हणतात xx च्या उलट्या बोंबा’ अशी टीका भाजपने केली आहे. यांसदर्भातील पोस्ट भाजपचे आपल्या एक्स हॅंडलवर केली आहे.
मा. @Dev_Fadnavis जींनी मराठा समाजाला कायदा करून दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर घालवले. @OfficeofUT नी मराठा समाजाचे आरक्षण घालवले नसते तर आज आंदोलनाची वेळच आली नसती. आता तेच उद्धव ठाकरे देवेंद्रजींना मराठा आरक्षणावरुन सवाल करत आहेत.
याला म्हणतात xx च्या…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 31, 2023
राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आजचा उपोषणाचा सातवा दिवस असून सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संतप्त मराठा तरुणांकडून जाळपोळीच्या घटना घडवण्यात येत आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनीही लोकसभेतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
‘द टायगर इफेक्ट’ बॉक्स ऑफिसवर गणपत पलिकडे जाणारा टायगर श्रॉफचा अनोखा प्रवास!
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करावी अन्यथा राजीनामे द्यावे, असे आव्हानही दिले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी, पियुष गोयल, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, भारती पवार, भागवत कराड असे सर्व जण मोदी कॅबिनेटमध्ये आहेत. या मंत्र्यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यातील परिस्थिती मांडायला हवी, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.
मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचाच पहिला राजीनामा; सत्ताधारी गटात नाराजी वाढली
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर भाजपने खोचक उत्तर दिलं आहे. “देवेंद्रजींनी मराठा समाजाला कायदा करून दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर घालवले. उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचे आरक्षण घालवले नसते तर आज आंदोलनाची वेळच आली नसती. आता तेच उद्धव ठाकरे देवेंद्रजींना मराठा आरक्षणावरून सवाल करत आहेत. याला म्हणतात xx च्या उलट्या बोंबा!” अशी पोस्ट भाजपकडून शेअर करण्यात आलीयं.
तसेच “बाप रुग्णालयात असताना पोरगा लंडन मध्ये काय करत होता ते उद्धव यांनी आधी सांगावे. मग देवेंद्रजींना विचारावे की, बाहेर प्रचारासाठी का गेलात? मुंबई बुडत असताना बाळासाहेबांना होडीत सोडून स्वतः फाईव स्टारमध्ये ते काय करत होते ते उद्धव यांनी आधी सांगावे मगच देवेंद्रजींना प्रश्न विचारण्याचे धाडस करावे. उद्धवजी आणखी सांगू का? म्हणजे यादी वाढवता येईल, असे सवालही विचारण्यात आले आहेत.