लोकसभेतून मराठा आरक्षण देणे खूप सोपे… संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा! उद्धव ठाकरेंची मागणी

लोकसभेतून मराठा आरक्षण देणे खूप सोपे… संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा! उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : लोकसभेतून मराठा आरक्षण देणे खूप सोपे आहे, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. राज्यातील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Balasaheb Thackeray has demanded that a special session of Parliament be called on the Maratha reservation issue.)

अन्यथा राजीनामे द्या :

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करावी अन्यथा राजीनामे द्यावे, असे आव्हानही दिले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी, पियुष गोयल, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, भारती पवार, भागवत कराड असे सर्व जण मोदी कॅबिनेटमध्ये आहेत. या मंत्र्यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यातील परिस्थिती मांडायला हवी.

Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं

राज्यात जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, त्या तोडण्यासाठी फक्त संसदेत कायदा करुनच निर्णय घेता येईल. तो घेणार नसालं तर आम्ही मंत्रिमंडळातून राजीनामा देतो, असे महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले पाहिजे. त्यानंतरही निर्णय झाला नाही तर राज्यातील 48 खासदारांनी राजीनामे दिला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जशी चळवळ उभी राहिली होती, तशी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील एकता दाखवून दिली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

Maratha reservation : जाळपोळीचं लोन आता नगरमध्येही, रोहित पवारांच्या मतदारसंघात जाळले टायर

मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा, आम्ही त्यांच्यासोबत :

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेतली, पण ती शपथ त्यांनी मुख्यमंत्रीपदाव बसल्यानंतर दीड वर्षांनी का घेतली, मधल्या काळात हा प्रश्न सोडवायला काही हरकत नव्हती, अशी टीका ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले. आजही ते राज्याच्या पातळीवरती हा विषय सोडवत असतील आम्ही त्यांच्यासोबत आहोत, भले तुम्ही आमच्याशी बोलू नका, काही करा, पण मार्ग काढा, अशी विनंती केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube