उजनीतील AI डेटा सेंटरविरोधात रोहित पवारांचे आंदोलन; पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

Rohit Pawar Ujani AI Data Center; या प्रकल्पाला विरोध करत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन सुरु आहे.

Rohit Pawar Ujani AI Data Center Protest

Rohit Pawar Ujani AI Data Center Protest

Rohit Pawar Ujani AI Data Center Protest: सोलापूरातील उजनी धरण परिसरात प्रस्तावित 3 हजार मेगावॅट क्षमतेच्या AI डेटा सेंटर प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकल्पाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला शेतकरी, शेतमजूरांनी पाठींबा दिला.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा भव्य प्रारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

दुसरीकडे, या प्रकल्पाच्या समर्थनार्थ सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जनसमर्थन आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. या आंदोलनात सत्ताधारी भाजपचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे उजनीतील डेटा सेंटरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत.

प्रशासनाकडून 28 मुद्द्यांवर खुलासा

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रकल्पाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या 28 आक्षेपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, अशी भूमिका मांडली आहे.

2027 ची जनगणना यंदा अधिक मोठी, नागरिकांना विचारले जाणार 40 प्रश्न, 15 दिवसांच्या स्वयं-गणनेची सुविधाही!

प्रशासनाच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी 0.5 टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. उजनी परिसरात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प किंवा स्मॉल मॉड्युलर रिअ‍ॅक्टर उभारण्याचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच तरंगता सौरऊर्जा प्रकल्प खोल पाण्यात उभारण्यात येणार असून, डेटा सेंटरमुळे पाण्याचं प्रदूषण होणार नाही किंवा मत्स्यसंपदा आणि जैवविविधतेला धोका निर्माण होणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.

‘प्रकल्प होऊ देणार नाही’; रोहित पवारांचा इशारा

मात्र, प्रशासनाने दिलेली माहिती चुकीची असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. इथे लोकांना दुष्काळात प्यायला पाणी नाही, शिवाय या प्रकल्पासाठी उजनी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

“आमचा विकासाला विरोध नाही. येथे सेमीकंडक्टर किंवा ऑटोमोबाईल उद्योग आणले, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. मात्र, इतर राज्यांतून बाजूला पडलेले प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात असतील, तर त्याला आमचा विरोध आहे,” अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.

सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाने 34 नगरसेवक अडचणीत; फेरनिवडणुकीची टांगती तलवार

या प्रकल्पाचा फायदा नेते आणि खासगी कंपनीला होईल, तर शेतकरी अडचणीत येतील, अशी टीकाही त्यांनी केली. उजनी धरणाचे खरे हक्कदार शेतकरी, शेतमजूर आणि कोळी बांधव असल्याचं सांगत, त्यांच्या हितासाठी हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या खुलाशावर आंदोलकांची पुढील भूमिका काय असेल आणि या आंदोलनाचा प्रकल्पाच्या भवितव्यावर काय परिणाम होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Exit mobile version