Download App

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर की संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न; ‘वंचित’च्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला संशय

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर की संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का? असा संशय वंचितच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केलायं.

Utkarsha Rupwate On Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार घटनेतील (Badlapur Rape Case) आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) की शिक्षणसंस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न, असा संशय वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते (Utakarsha Rupawate) यांनी व्यक्त केलायं. दरम्यान, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत एन्काऊंटर करण्यात आलायं. या मुद्द्यावरुन आता विरोधकांसह वंचित बहुजन आघाडीनकडूनही संंशय व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. रुपवते यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीयं.

रुपवते म्हणाल्या, बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी अनेक आंदोलने झाली. त्यानंतर आता आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस कस्टडीत असताना मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी अक्षयने आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं त्यानंतर पोलिसांनी स्वरंक्षणासाठी गोळीबार करत अक्षय शिंदेला ठार केलं असल्याचं सांगितलं जात आहे. कुठल्याही गुन्हेगाराला एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये मॅॅन्यूअल पद्धतीने 5 वाजेच्या आतमध्ये नेण्याची प्रक्रिया आहे, मात्र, पोलिसांनी 5 वाजेनंतर ही प्रक्रिया केलीयं, अशी प्रक्रिया केली नसती तर ही घटना टळली असते. या प्रकरणाता बलात्काऱ्यांबद्दल सहानूभुती दर्शवत नाही तर ही प्रक्रिया तशा पद्धतीने पुढे जायला हवी. अत्याचार प्रकरणी शिक्षणसंस्थेच्या चालकांवर, पदाधिकाऱ्यांही गुन्हा दाखल आहे, मात्र, त्यांना अद्याप अटक नाही, सापडत नसल्याची कारणे दिली जात आहेत, हा एन्काऊंटर संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवालही रुपवते यांनी यावेळी व्यक्त केलायं.

व्हिडिओला लाईक केलं तरी चौकशी होणार; पुणे पोलिसांचा घाम फोडणारा आदेश नेमका काय?

तसेच अत्याचाराचं प्रकरण न्यायप्रविष्टा असताना पोलिसांकडून असा न्याय देण्याचा पायंडा पाडला जात असेल तर तो धोकादायक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पोलिसांचे जे रिपोर्ट आहे त्याचा सरकारने खुलासा केला पाहिजे. अक्षयने त्याचा गुन्हा कबूल केला होता अद्यापही अजून कोणी अत्याचारीत मुली आहेत का? हा प्रश्न मागे पडला सीसीटीव्ही फुटेज गायब झाले या घटना क्लेशदायक असल्याचंही रुपवते यांनी स्पष्ट केलंय.

follow us