अक्षय शिंदे एन्काउंटर : जयंत पाटलांनी गंभीर सवाल करत सरकारला घेरलं..
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.

Jayant Patil on Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने (Akshay Shinde Encounter) पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. तर अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. जीपमधून प्रवास करत असताना अक्षयने पोलिसांच रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेचे दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटत आहेत.
विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. तसेच या एन्काउंटवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या एन्काउंटरवर संशय व्यक्त केला आहे. दोन पोलिसांच्या मध्ये बसणारी व्यक्ती पुढच्या सीटवरील पोलिसाची रिव्हॉल्व्हर कशी काढू शकते? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Video: रावणाला जर हिंदुस्थानाने ठोकलं तर, अक्षय शिंदेंला सुट्टी देणार का?,नरेश म्हस्केंची पोस्ट काय?
जयंत पाटील म्हणाले, आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही. अक्षय शिंदेने जे कृत्य केलं ज्या शिक्षण संस्थेत केलं. त्या संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थाचालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला ? त्यांना कुणाला प्रोटेक्ट करायचं होतं? पालक पोलिसांकडे गेल्यानंतर गुन्हा नोंदवायला उशीर झाला यात कुणाचा दबाव होता? एक स्टोरी म्हणजे त्यांनी पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि स्वतःचा शेवट करून घेतला अशी सांगितली जात आहे.
दुसरी स्टोरी काही वेळाने बाहेर आली पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. पण गाडीत बसलेल्या माणसाचा एन्काउंटर करायची गरज काय होती? अक्षय शिंदे याला फाशी व्हावी ही पूर्वीपासूनची मागणी होती. आम्ही अक्षय शिंदेचा कुठेही समर्थन करत नाही.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात काही आरोप केले होते. त्यावरही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. अक्षय शिंदे जर पोलिसांच्या जीवावर उठला होता तर मग त्याने स्वतःचा अंत करून घेतला अशी बातमी आधी कशी आली. दोन पोलिसांच्या मध्ये बसलेली व्यक्ती पुढच्या पोलिसांची रिव्हॉल्वर कशी काढू शकते? ज्याने गोळ्या घातल्या त्याचही रेकॉर्ड बाहेर काढलं पाहिजे. त्याचंही नाव शिंदेच आहे. पण अक्षय शिंदे याचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही. त्याला फाशीची शिक्षाच व्हायला हवी अशी आमची आधीपासूनची मागणी होती.
Encounter: इकडं अक्षय शिंदेचा एन्काऊंटर अन् दुसरीकडे संस्थाचालक आपटे जामिनासाठी हायकोर्टात