VBA Loksabha candidate List : महाविकास आघाडीत स्थान न मिळालेल्या वंचित बहुजन आघाडीने (Lok Sabha Election) लोकसभेसाठी आता स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) आज अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनीही उमेदवारी यादी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी आठ जागांवर उमेदवार दिले होतो. त्यामुळे आतापर्यंत वंचितने 19 जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. दुसऱ्या यादीत सोलापूर, माढा, सातारा या महत्त्वाच्या जागांवर वंचितने उमेदवार दिले आहेत.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडी येईल, असे चित्र काही दिवसांपूर्वी होते. परंतु महाविकास आघाडीतील नेते व प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकमत झाले नाही. त्यानंतर एकमेंकाविरोधात थेट तोफ डागल्याने एकत्र येण्याचे मार्गही आता बंद झाले आहेत. त्यात प्रकाश आंबेडकर हे थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तोफ डागू लागले आहेत. काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला होता. परंतु केवळ कोल्हापूर, नागपूर जागेबाबत आंबेडकरांनी पाठिंबा दिला आहे. इतर जागांवर अद्याप पाठिंबा दर्शविलेला नाही. अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून मैदानात उतरले आहे. त्याविरोधात काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर हे सहभागी होतील, अशा आशा आता संपुष्टात आल्या आहेत. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी रविवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहेत.
Loksabha Election : रिपाईला एकही जागा नाही… पण आठवलेंना स्टार प्रचारक केले
प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या ?
त्यात सोलापूर, माढा, सातारा या महत्त्वाच्या तीन जागांवर उमेदावर दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला डोकेदुखी ठरणार आहे. सोलापूर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदेंना काँग्रेसने उमेदवारी दिली आहेत. तर भाजपकडून आमदार राम सातपुते रिंगणात उतरले आहे. या मतदारसंघात जबरदस्त चुरस दिसून येत आहेत. त्यात आता वंचित बहुजन आघाडीने राहुल काशिनाथ गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मागील निवडणुकीत तिरंगी लढतीला फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता. मतविभाजनाचा भाजपचा उमेदवारी विजयी झाला होता. मागील प्रमाणेच वंचितने येथे उमेदवार दिलाय. त्यामुळे प्रणिती शिंदेंसाठी ही काही प्रमाणात धोक्याची घंटा आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ पुन्हा अडचणीत ? अंजली दमानियांचा पाठपुराव्यानंतर सुनावणी होणार
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its second list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections. pic.twitter.com/9TFe472Byw
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 31, 2024
दोन मतदारसंघात मुस्लिम उमेदवार
माढा लोकसभा मतदारसंघात रमेश नागनाथ बारसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते माळी (लिंगायत) समाजाचे आहेत. तर सातारा मतदारसंघात धनगर मतदारही मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात मारुती धोंडीराम जानकर यांना उमेदवारी दिली आहे. तर धुळे मतदारसंघात अब्दुल रहमान, मुंबई-उत्तर-मध्य मतदारसंघात अबु हसन खान यांना मैदानात उतरविले आहे. उमेदवारी देताना जातीचा विचार केला आहे. बंजारा, मांतग, बौध्द, माळी, जैन, कुणबी या जातीचे उमेदवार मैदानात उतरविले आहेत.
वंचितचे उमेदवार
माढा- रमेश नागनाथ बारसकर – माळी (लिंगायत)
सातारा -मारुती धोंडीराम जानकर – धनगर
हिंगोली – डॉ. बीडी चव्हाण – बंजारा
लातूर – नरिसिंहराव उदगीरकर – मातंग
सोलापूर- राहुल काशिनाथ गायकवाड- बौद्ध
धुळे- अब्दुर रहमान -मुस्लीम
हातकलंगणे – दादासाहेब पाटील – जैन
रावेर – संजय पंडीत ब्राम्हणे – बौद्ध
जालना – प्रभाकर देवमन बकले – धनगर
मुंबई उत्तर मध्य – अबु हसन खान – मुस्लीम
रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी – कुणबी