Vijay Wadettiwar : ईव्हीएम(EVM)मशीनबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातला संभ्रम दूर करा, एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका (Elections on ballot paper)घेऊन दूध का दूध अन् पाणी का पाणी होऊन जाऊद्या असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. त्याच मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी देखील संशय व्यक्त करत एक निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली. त्यालाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही पाठिंबा दिला आहे.
Devendra Fadanvis : एकाच व्यासपीठावर राहा, आम्ही तुमच्या पाठीशी; फडणवीसांचा मुंडे बंधु-भगिनीला सल्ला
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप विरोधात असताना त्यांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी देखील अशीच भूमिका मांडली होती. त्यावेळी भाजपकडून कॉंग्रेस ईव्हीएमच्या भरवश्यावरच जिंकते असा आरोप केला जात होता.
Devendra Fadanvis : एकाच व्यासपीठावर राहा, आम्ही तुमच्या पाठीशी; फडणवीसांचा मुंडे बंधु-भगिनीला सल्ला
ईव्हीएम सदोष असल्याचे सांगत असतानाच त्यांनी उदाहरणादाखल भंडारा लोकसभा निवडणुकीतील नाना पटोलेंचा दाखला दिला. त्यांनी सांगितले की, भंडारा लोकसभेचा नाना पाटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचा उमेदवार 67 हजार मतांनी निवडून आला.
त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार अडीच लाख मातांनी निवडून येतो. सहा महिन्यात इतकं मतपरिवर्तन कसं घडू शकतं, असं म्हणत यावर वडेट्टीवारांनी संशय व्यक्त केला आहे.
अमेरिकेसारख्या प्रगत देशाने देखील ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेणं बंद केलं आहे. लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला पाहिजे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो, असे तुम्ही सांगता आहे तर एकदा बॅलेट पेपरवर घेऊन लोकांच्या मनातील संशय दूर करा असंही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.