बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका

Vijay Wadettivar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Vijay Wadettivar) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा मानला जात आहे. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिद्दीकी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही, […]

Vijay Wadettivar Health

Vijay Wadettivar Health

Vijay Wadettivar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Vijay Wadettivar) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा मानला जात आहे. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिद्दीकी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

विजय वडेट्टीवार म्हणाले, कोण गेला म्हणजे पक्ष घेऊन जातो असं काही नाही. विचार करायला आदर्शाला फार मोठं महत्व असतं. माझ्या माहितीप्रमाणे ते गेल्याने जनाधार जात नाही अजित पवार गेले म्हणजे शरद पवारांचा जनाधार जातोयं असं काही नसतं. ज्यांची ज्यांची लायकी काय आहे ते मतदार दाखवून देतीलच. बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेसचं काही नूकसान होणार नाही. बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी जन्माने ओबीसी नाहीत, ते तर…; राहुल गांधींनी केला मोदींच्या जातीचा उल्लेख

तसेच मागील 15 दिवसांपासून बाबा सिद्दीकी जाणार अशा वावड्या होत्या. देशात मतांसाठी धर्माचा, देवाचा वापर केला जातोयं. धर्मात दरी विष पेरण्याचं काम जनतेला माहित आहे त्यांना रोखण्याचं काम आम्ही करणार असल्याच निर्धारही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. येत्या काही दिवसात ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हेही पक्ष सोडणार आहेत का? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

आपल्या राजीनाम्याबाबत माहिती देताना सिद्दीकी म्हणाले, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते. पण ते म्हणतात ना त्याप्रमाणे काही गोष्टी न बोललेले चांगले असते. मला या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले.

Exit mobile version