पंतप्रधान मोदी जन्माने ओबीसी नाहीत, ते तर…; राहुल गांधींनी केला मोदींच्या जातीचा उल्लेख
Rahul Gandhi on PM Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधतांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी (OBC) नाहीत, ते ओबीसीमध्ये जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातमधील तेली समाजात झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली जात ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींनी हे हे विधान केलं. त्यांच्या या आरोपामुळं राजकारणात खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे यांचा मोठा निर्णय! माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह एका मनसैनिकाची हकालपट्टी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला सर्वात मोठा ओबीसी असल्याचे सांगितले होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसने कधीही ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. या लोकांनी ओबीसी नेत्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, अशी टीका मोदींनी केली होती. दरम्यान, मोदींच्या टीकेला आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं. पीएम मोदींचा जन्म ओबीसी प्रवर्गात झाला नाही. त्यांचा जन्म गुजरातमध्ये तेली समाजात झाला. आपल्या सर्वांना भयंकर बेवखूप आणि मुर्ख बनवलं जात आहे. तेली जातीसमूहाला २००० साली भाजपने ओबीसीचा दर्जा दिला होता. त्यामुळं मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, असा दावा राहुल गांधींनी केला. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ओडिसातून मार्गक्रमण करत आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी बोलत होते.
पत्नीच्या तक्रारींच्या फटकेबाजीवर थोरात क्लीन बोल्ड, वाढदिवसानिमित्त जुन्या आठवणीत रमलं दाम्पत्य
पुढं बोलतांना ते म्हणाले की, मोदींचा जन्म खुल्या वर्गात झाला. तरीही ते खोटं बोलून आपण जन्मजात ओबीसी असल्यचां सांगत आहे. मात्र, ते ओबीसी नाहीत. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही जात जनगणना होऊ देणार नाहीत, असा राहुल गांधी म्हणाले. जातीय गणना फक्त आणि फक्त राहुल गांधी आणि कॉंग्रेसच करू शकते, असंही राहुल म्हणाले.
राहुल गांधींना काहीही ज्ञान नाही – केंद्रीय मंत्री कौशल किशोर
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका ओबीसीवरून टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री कौशल किशोर म्हणाले की, राहुल गांधींनी आधी जातींचा अभ्यास करावा. तेली जातीचे लोक कोणत्या वर्गात मोडतात हे देखील त्यांना माहीत नाही. आणि पंतप्रधान त्याच जातीचे आहेत. राहुल गांधींना देश आणि समाजाविषयी काहीही ज्ञान नाही, असे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हटले आहे