पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar : राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत असल्यानं शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षाही (Base Price) कमी दराने होत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सोयाबीन असो की, इतर पिकांची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने व्यापाऱ्यांकडून केली जातेय. पण, पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला (Mahayuti) शेतकऱ्यांचा विसर पडल्याची घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.
ओमराजेंच्या विरोधात माजी IAS अधिकारी? भाजपच्या डोक्यात लातूर भुकंपातील ‘हिरोचे’ नाव
वडेट्टीवार यांनी आपल्या एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, सोयाबीनची खरेदी जागतिक बाजारपेठेवर आधारित असल्याचे सांगितले जात असले तरी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जाऊ नये, असं अपेक्षित आहे. मात्र सोयाबीन असो की, इतर पिकांची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. पण, पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
सोयाबीनची खरेदी जागतिक बाजार पेठेवर आधारित असल्याचे सांगितले जात असले तरी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जाऊ नये, असे अपेक्षित आहे. परंतू सोयाबीन असो की, इतर पीकांची खरेदी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने केली जात आहे. पण पक्ष…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 8, 2024
पुढं त्यांनी लिहिलं की, कमी खर्चात येणारं पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. परंतु गेल्या काही वर्षात किडींचा प्रादुर्भाव, निसर्गाचा असमतोलपणा, वाढलेली मजुरी, बी-बियाणे व औषधांचे चढे दर यामुळं सोयाबीन शेती परवडणारी राहिलेली नाही. त्यातच किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदील झाला आहे. तसंच केंद्र सरकारकडून देखील सोयाबीनचा हमीभाव अत्यंत कमी ठरण्यात आला असून व्यापाऱ्यांकडून देखील सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षाही कमी किमतीत केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च देखील भरून निघथ नसल्याची वस्तुस्थिती आहे. तरी देखील सरकार गप्प आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
युपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचं नूकसान; मोदी सरकारचा श्वेतपत्रिका काढत हल्लाबोल
सरकारला शेतकरी धडा शिकवेल
केंद्र सरकारकडू 2022-2023 मध्ये सोयाबीनचा हमीभाव प्रती क्विंटल 4 हजार 300 रुपये तर 2023-2024 मध्ये 4,600 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला होता. सोयाबीनचा उत्पादन खर्च लक्षात घेता हा हमीभाव कमी आहे. सर्वच व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा अत्यंत कमी दरात करण्यात आली असून हे दर 4 हजार रुपयांच्याही खाली आले होते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काही दिवसांपासूनन छत्रपती संभाजी नगर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल 3 हजार 800 तर नागपूर बाजार समितीत 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल एवढा निच्चांकी भाव मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा खर्च देखील भरून निघणं मुश्कील झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये सरकारप्रती प्रचंड चीड निर्माण झालेली असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला शेतकरी धडा शिकवेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.