Download App

निकालाची स्क्रिप्ट वरून आली, आजचा निकाल ठाकरेंच्या विरोधात लागणार; वडेट्टीवारांचा दावा

  • Written By: Last Updated:

Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निकाल घोषित करत आहेत. दरम्यान, या निकालाबाबत नेतेमंडळी तर्क वितर्क लढवत आहेत. ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी आजचा निकाला हा ठाकरे गटाच्या विरोधात लागले, असं वक्तव्य केलं. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही निकाल आधीच ठरलेला आहे, फक्त विधानसभा अध्यक्षांना तो आज वाचून दाखवणणार आहेत. हा निकाल ठाकरे गटाच्य विरोधात असू शकतो, असं विधान त्यांनी केलं.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार नाही, काँग्रेसची मोठी घोषणा

आज विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात विचारले. त्यावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, कायद्यानुसार आणि कायद्याच्या चोकटीत बसेल, या निकालापची अपेक्षा नाही. कारण, सत्तेत असणाऱ्यांना लोकांना सत्तेच्या बाहेर काढायचं नाही, असं ठरलं आहे. आजची स्क्रिप्ट वरून पाठवण्यात आली. वरून जे लिहून पाठवलं आहे, तेच अध्यक्षांना वाचायचं आहे. हा निकाल ठाकरे गटाच्या विरुध्द असेल. त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल. तेव्हा सुर्वोच्च न्यालायात नार्वेकरांनी दिलेला निकाल मात्र टीकाणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

नुसता जाळ नी धूर! रोहित शेट्टीने शेअर केला सिद्धार्थचा ‘इंडियन पोलिस फोर्स’चा दमदार लूक 

सच्चे को होगी फासी, झुठा मौज उठायेगा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घेतलेली भेट घेतली होती. या भेटीवर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतता होता. ही मिलीभगत आहे, अशी टीका करत न्यायमूर्तीनी आरोपींशी बंददाराआड चर्चा करत असतील तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करणार, असा सवाल केला होता. दरम्यान, आता वडेट्टीवार यांना या भेटीविषयी विचारल असता ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष सध्या न्यायमूर्तींच्या भूमिकेत आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. मात्र, अपात्रतेचा निकाल तोंडावर असतांना विधानसभा अध्यक्षांनी मुख्यंत्र्यांशी अशी भेट घेणं हे प्रोटोकॉलंच उल्लंघन आहे. निकालाच्या आधी भेट घेतल्यानं निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हा निकाल कालच्या भेटीत झाला असेल, असं बोलल्या जातं. मात्र, निकाल बऱ्याच दिवसांआधी ठरला आहे. अध्यक्ष फक्त तारीख पुढं ढकलत होते. आजच निकाल हा सच्चे को होगी फासी, झुठा मौज उठायेगा, असा असेल, असं वडेट्टीवार म्हणालेय

तर सर्व निकाल दोन दिवस अगोदरच ठरल्याटचा दावा वैभव नाईक यांनी केला. मी कामानिमित्त मंत्रालयात आलो होतो, त्यावेळी शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार मला भेटले. त्यांनी मला सांगितले की तुम्हाला अपात्र ठरणार आहे, असं नाईक म्हणाले. त्यामुळं आजचा निकाल कोणाच्या बाजून लागतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us

वेब स्टोरीज