प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून काँग्रेस दूर, अयोध्येत हजर न राहण्याचा पक्षाचा निर्णय
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार नसल्याचे काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे. यासोबतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजनही यात सहभागी होणार नाहीत. काँग्रेस नेत्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे.
काँग्रेस काय म्हणाली?
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवेदन जारी करून म्हटले आहे की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले होते. करोडो भारतीय प्रभू रामाची पूजा करतात. धर्म ही माणसाची वैयक्तिक बाब आहे, पण गेल्या काही वर्षांत भाजप आणि आरएसएसने अयोध्येतील राम मंदिराला राजकीय स्वरुप बनवले आहे.
Prithviraj Chavhan : जागा वाटप अन् आमदार अपात्रतेबाबत कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान
ते पुढे म्हणाले, निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी अर्ध्या बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा 2019 चा निर्णय स्वीकारून आणि लोकांच्या श्रद्धेचा आदर करून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांनी या कार्यक्रमासाठी भाजप आणि आरएसएसचे निमंत्रण आदरपूर्वक नाकारले आहे.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण
Here is the statement of Shri @Jairam_Ramesh, General Secretary (Communications), Indian National Congress. pic.twitter.com/JcKIEk3afy
— Congress (@INCIndia) January 10, 2024
22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6 हजारांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत.