Download App

…मग आरक्षण दिलं तेव्हा भाजपची सत्ता होती का? पाप झाकण्यासाठी कॉंग्रेसवर टीका; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar On PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर केलेल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. कॉंग्रेसच्या (Congress) धोरणांवरही तोंडसुख घेतलं. कॉंग्रेस आरक्षणविरोधी असल्याची टीका मोदींनी केली. या पार्श्वभूमीवर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यानंतर आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनीही भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं.

पक्ष, चिन्ह जाताच सुप्रिया सुळेंचं लोकसभेत पहिलं भाषण; मोदी सरकारला घेरलं 

आज माध्यमांशी बोलतांना विजय वडेट्टीवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना मोदींनी कॉंग्रेस आणि नेहरूंवर केलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणाले की, नेहरूंचं नाव घेतल्याशिवाय भाजपला आणि मोदींना झोपच लागत नाही. कारण, नेहरूंचा विकास यांच्या डोळ्यात खुपतोय. नेहरूंनी दहा वर्ष जेलमध्ये घातली. त्यांच्या परिवाराने देशासाठी मोठा त्याग केला. भाजप आणि आरएसएसवाले हे इतिहास वाचत नाहीत, जो इतिहास घडला नाही, तो खोटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जातो. कॉग्रेस आरक्षण विरोधी असल्याचं वक्तव्य पंतप्रधानांच्या तोंडी शोभत नाही. कॉंग्रेस आरक्षण विरोधी असती तर मोदी पंतप्रधान होईपर्यंत या देशात आरक्षणच टिकलंच नसतं. आता आपल्या हातून सत्ता जातेय, हे लक्षात आल्यावर भाजप आणि मोदी आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलं.

सुहास दिवसे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुखांची क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती 

वडेट्टीवार पुढं म्हणाले, कॉंग्रेस आरक्षण विरोधी असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीचं अध्यक्ष काय भाजप आणि संघाने केलं होतं का? असा सवाल त्यांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांची निवड ही कॉंग्रेसने केली होती. बाबसाहेबांची विद्वत्ता, त्यांचा दुरदृष्टीपणा, शोशितांप्रती असलेली भूमिका पाहून कॉंग्रेसने त्यांना संविधान समितीचं अध्यक्ष केलं. जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा भाजपची देशात भाजपची सत्ता नव्हती, असं वडेट्टीवार म्हणाले.

यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांबाबतही भाष्य केलं. ईडी आणि सीबीआय बाजूला सारलं तर एकही नेता दूर जाणार नाही. ईडी आणि सीबीआयचं दुकान बंद केल्यावर कोणता पक्ष तुटतो हे भविष्यात दिसेल, असं वडेट्टीवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?
मोदींनी आज नेहरूंवर केलेली टीका योग्य नाही. राजकारणात वेगवेगळ्या विचारधारा असतात. पण देशासाठी काम करणाऱ्यांना आपण दुर्लक्षित करू शकत नाही. जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी देशासाठी चांगले काम केले आहे. याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मात्र पंतप्रधान याकडे लक्ष देत नाहीत. हरकत नाही. त्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला आहे. मला विश्वास आहे की देशातील नवीन पिढी इतिहासाची चुकीची मांडणी करणारी विचारधारा लांब ठेवण्याचं काम करेल, असं पवार म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज