Download App

वोट जिहाद प्रकरण, मुफ्ती इस्माईल सभागृहात भडकले, किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

Mufti Ismail On Kirit Somaiya : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लोकसभा निवडणुकीत मालेगाव मतदारसंघात

  • Written By: Last Updated:

Mufti Ismail On Kirit Somaiya : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लोकसभा निवडणुकीत मालेगाव मतदारसंघात (Malegaon Constituency) बाहेरुन पैसे आले असून त्याचा वापर वोट जिहादसाठी करण्यात आला असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. याच बरोबर त्यांनी बांग्लादेशी नागरिक मालेगावात राहत आहे असा आरोप करत त्यांनी या नागरिकांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा देखील कामाला लावली होती. मालेगावात बांग्लादेशी नागरिक शोधण्यासाठी पोलिसांचे विशेष तपास पथक देखील काम करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता मालेगावचे आमदार आणि एआयएमएम नेते (Aimim) मुफ्ती इस्माईल (MLA Mufti Ismail) यांनी विधिमंडळात प्रश्व उपस्थित करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

विधानसभेत बोलताना आमदार मुफ्ती इस्माईल म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी मालेगावातील झोपडपट्टी आणि गरीब लोकांची वस्ती पाहून ते सर्व बांग्लादेशी आहेत, असा निष्कर्ष काढला मात्र त्यांच्या या राजकीय भुमिकेमुळे काही लोकांना त्रास देखील सहन करावा लागला. मालेगावाला राजकीय दृष्ट्या अशी वागणूक योग्य नाही असं यावेळी मुफ्ती इस्माईल म्हणाले.

पुढे बोलताना मुफ्ती इस्माईल म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मालेगावच्या बॅंकेत मोठ्या प्रमाणावर निधी आला, हा निधी वोट जिहादसाठी आल्याचा आरोप केला होता. मात्र या प्रकरणाची पुरेशी चौकशी का झाली नाही? तसेच पोलिसांना या चौकशीत काय आढळले? हे तपास यंत्रणा का सांगत नाही? असा प्रश्न देखील सभागृहात बोलताना आमदार मुफ्ती इस्माईल यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे सध्या या प्रकरणावर किरीट सोमय्या देखील मौन बाळगून असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

अमेरिकेत ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ संपणार? डोनाल्ड ट्रम्पने न्यायालयात दाखल केली याचिका

लोकसभा निवडणुकीनंतर किरीट सोमय्या यांनी मालेगावाचा तीन ते चार वेळा दौरा केला आहे. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मालेगावातील बांग्लादेशी नागरिकांच्या तपासासाठी विंनती देखील केली होती.त्यानुसार सहाय्यक पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक नियुक्त करण्यात आले आहे. माहितीनुसार, या पथकाने आतापर्यंत मालेगावात 3 हजारपेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे.

follow us