Prakash Ambedkar News : अजित पवारांचं (Ajit Pawar) बंड लवकरच थंड होणार असून ते वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केलं आहे. प्रकाश आंबेडकर पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला आहे.
किलर पोज देत अवनीतने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके
ते म्हणाले, राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारची चर्चा आहे पण सरकारच्या गोंधळामध्ये सर्वात शेवटी शेतकरी गेला आहे. अजित पवारांचं बंड लवकरच थंड होणार असून ते वर्षभरात राष्ट्रवादीत येणार असल्याचं भाकीतही आंबडेकर यांनी केलं आहे.
Carlos Alcaraz : परिस्थितीने वडिलांना टेनिस खेळू नाही दिलं, पण मुलाच्या खेळाची प्रेक्षकांना भूरळ…
तसेच यंदाची दिवाळी अजित पवारांना एकट्यालाच साजरी करावी लागणार आहे. मात्र पुढील वर्षी मात्र ते कुटुंबात दिवाळी साजरी करतील, अशी आपण अपेक्षा धरू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपला महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत. त्यांना राज्यात एकही विरोधक नको आहे. यातूनच राज्यात फोडाफोडीचे
राजकारण सुरू असून दुर्दैवाने हे विरोधकांच्या लक्षात येत नसल्याची टीकाही आंबेडकरांनी भाजपवर केली आहे.
Jar Tar Drama: अखेर १० वर्षानंतर प्रिया-उमेशने दिली गुड न्यूज! नव्या नाटकाची पहिली झलक समोर
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत उभी पाडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यात मोठा भूकंपच झाला. त्यानंतर अजित पवारांसह इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज पावसाळी अधिवेशनालाही सुरुवात झाली.
अशातच राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं असून प्रकाश आंबेडकर यांनी वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही एक होतील, असं भाकीत केलंय. त्यावरुन आता पुढील काळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का? या प्रश्नाचं उत्तर आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.