Opposition Meeting ; विरोधी पक्षांच्या मंथनासाठी बंगळुरूमध्ये दिग्गज पोहचले, पाहा फोटो

बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची दुसरी बैठक होणार आहे. 2024 मध्ये भाजपला घेरण्यासाठी दोन दिवस मंथन होणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी या बैठकीत सहभागी झाले आहेत.

विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी प्रथमच उपस्थित राहिल्या आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या देखील डिनर बैठकीसाठी पोहोचल्या आहेत.

जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कर्नाटकातील बेंगळुरू येथे डिनर बैठकीसाठी पोहोचले आहेत.

डीएमके प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन बेंगळुरू येथे डिनर बैठकीसाठी पोहोचले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे खासदार संजय सिंह हे देखील बेंगळुरूला पोहोचले आहेत.

आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील बंगळुरूमध्ये डिनरसाठी पोहोचले आहेत.
