Sadabhau Khot On Manoj Jarange : मराठा आरक्षण, सगेसोयरेंचा अध्यादेश व इतर मागण्यांसाठीमनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. जरांगे हे थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या नेत्यांनाही जरांगे हे सोडत आहे. आता मात्र भाजपच्या पाठिंब्यावर विधानपरिषदेत वर्णी लागलेले रयत संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केलीय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना घेरण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला मैदानात उतरावे लागणार आहे. कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही ? असा सवालही खोत यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना जरांगे यांना केलाय.
तर भाजपच्या 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार अन् फडणवीसांनाही उलटेपालटे..; जरांगेंचा इशारा
जरांगे हे महाविकास आघाडीला मदत करत असल्याचे सांगत खोत म्हणाले; लोकसभेला ते बाहेर पडले. आता त्यांचा नांगर सुरू झाला आहे विधानसभेसाठी. त्यांना महाविकास आघाडीचे शेत नांगरायचे आहे. पण खऱ्या अर्थाने मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला आहे. मराठा समाजाला उपेक्षित ठेवले तो शरद पवार यांनी. त्यांच्याविरोधात बोलायचे हिम्मत नाही. आंदोलन करण्याची हिम्मत नाही. ज्यांनी दिलं, त्यांच्याविरोधात ते आंदोलन करत असतील, भाषा बोलत असतील. तर निश्चितपणे कटकारस्थान आहे. मी रयत समाजाचा, गरीब मराठाचा पोरगा आहे. आम्ही मराठा आहे. आम्हाला आमचं भलं कळतं. आम्ही कुणाच्या हातात भलंपण दिलेले नाही. आम्ही आमच्यासाठी लढण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही योग्य मार्गाने आंदोलन करा, न्याय मागा. परंतु देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला मैदानात उतरावे लागणार आहे. कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही.
भाजपसाठी उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं आव्हान, त्यांचं नाव घेतल्याशिवाय…; अमित शाहांच्या टीकेला अधारेंचं प्रत्युत्तर
आंदोलनाच्या अडून दहशतवाद माजविलाय जातोय, खोतांचा आरोप
मराठा समाजाला ज्यांनी फसविले आहे. त्या पवारसाहेबांकडे तुम्ही जा. ओबीसी समाजामध्ये आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे, असे पत्र त्यांच्याकडून घ्या. सरकार सकारात्मक आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. आरक्षण टिकलेले आहे. मराठा भवन राज्या राज्यामध्ये उभे राहत आहे. ओबीसी समाजाच्या सवलती मराठा समाजाला लागू केल्या आहे. ज्यांनी पन्नास वर्षे मराठा समाजाची माती केली आहे. त्यांच्याविरोधात मात्र बोलण्याची तुमची हिम्मत होत नाही. म्हणून आम्ही ही मराठे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला आहोत. या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा आंदोलनाच्या अनुषंगाने एक दहशतवाद माजविला जातो आहे. कुणी मराठा बोलला तर तू मराठा नाही मराठ्यांचा विरोधात आहेस असे बोलले जाते. आमचा काय ठेका घेतला आहे ? असा सवालही सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.