Download App

Chandrashekhar Bawankule : “तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नका”, बावनकुळे पटोलेंवर इतकं का चिडले?

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण तापत आहे. या प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मतं मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये आणि तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नये असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांचा समाचार घेतला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, मात्र निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर आता एक्सवर ट्विट करत बावनकुळेंनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. मते मिळविण्यासाठी तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा मात्र तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नका असे बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले होते

नाना पटोले नाना पटोले म्हणाले होते, मी 2014 ते 2017 दरम्यान खासदार होतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी आणि जीएसटीची घोषणा केली होती. मात्र तेव्हा त्यांच्या या निर्णयाला मी स्वतः विरोध केला होता. मी जेव्हा खासदार होतो तेव्हा अकोल्याचे खासदार देखील होते.

MVA ची अडचण वाढणार, भिवंडीमध्ये शरद पवारांना आव्हान देणार काँग्रेसचा इच्छुक उमेदवार?

पण आता ते व्हेंटिलेटरवर असून, व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. मात्र, निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटरवर काढतील, असे नाना पटोले म्हणाले होते .

follow us

वेब स्टोरीज