Ajit Pawar : दिवाळीचा पाडवा ( Diwali Padwa) पवार कुटुंबीय एकत्र येऊन साजरा करत असतात. दरवर्षी न चुकता पाडवा साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीय गोविंदबागेत जमतात. त्याच दिवशी राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागेत हजेरी लावतात. मात्र, यंदा राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्याने अजित पवार (Ajit Pawar) पाडवा गोविंद बागेत साजरा करणार का, याबाबत अनेकांा उत्सुकता आहे. दरम्यान, आज पुण्यात पवार कुटुंबीयांच्या दिवाळी स्नेहभोजनाला अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत सामील झाले होते.
Ajit Pawar : अजितदादांचं विमान दिल्लीच्या दिशेने; राजकीय चर्चांना उधाण
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार याचं पुण्यातीतील बाणेर परिसरात निवास्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. रक्षाबंधनाला अजित पवार आले नव्हते. त्यामुळं दिवाळी आणि भाऊबीजेला येणार का, असा प्रश्न राज्यभरातील कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र, आज पवार कुटुंबीयांच्या दिवाळी स्नेहभोजनाला अजित पवार सहभागी झाले होते. सकाळी बारा वाजताच्या सुमारास अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार हे बाणेरला पोहोचले. त्यापूर्वीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे बाणेरला पोहोचले होते.
Sujay Vikhe यांचा पाठपुरावा अन् घरकुलांच्या लाभार्थ्यांना अंतिम हप्ता मंजूर…
त्यानंतर अजितदादा हे प्रतावराव पवारांच्या घरातून बाहेर पडले आणि त दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, प्रतापराव पवारांच्या घरी नेमकं काय घडले, ते शरद पवारांची बहीण सरोज पाटील यांनी बाहेर पडतांना सांगितलं.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काही चर्चा झाली का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी सरोज पाटील यांनी विचारला. त्यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, नेहमीसाऱख्याच कौटुंबिक गप्पा झाल्या. आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. नेहमीप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्र आले होते. एकमेकांची मजा, मस्करी, गप्पा रंगल्या होत्या, असं त्यांनी सांगितलं.
आता आणखी पाच दिवसांनी भाऊबीज आहे, पवार कुटुंबीय बारामतीत एकत्र येणार का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, बारामतीत एकत्र येणार नाही. मी कोल्हापूरला निघाले, असं त्यांनी सांगिलतं. अजित पवार यांची प्रकृतीही चांगली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जुलैमध्ये अजित पवारांनी बंड करून सत्तेत सामील झाले. त्यानंतर शरद पवारांनी दौर सुरू केले होते. शरद पवारांना उत्तर देण्यासाठी अजित पवारांनी उत्तरसभा घेतल्या. प्रिया सुळेंच्या खासदारकीविरोधात अजित पवार गटाने अपिल केले आहे. पण आता दिवाळीचा सण आला. दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबीय एकत्र येतात. मात्र, यंदा अजित पवार त्यात सहभागी होणार नाहीत. त्यांना डेंग्यू झाल्यानं डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. या वर्षी दिवाळीत कोणालाच भेटणार नाही, असे ट्विट खुद्द अजित पवार यांनी केले आहे.