Download App

राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार? अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितलं

Amol Mitkari News : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आम्हालाच मिळणार हे आधीच सांगत होतो, वरिष्ठांच्या आदेशानूसार आम्ही राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आल्यानंतर आता अजित पवार गटाकडून कार्यालये ताब्यात घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अमोल मिटकरींनी अद्याप आदेश आला नाही पण आल्यानंतर सूचनांचे पालन करणार असल्याचं सांगितलं आहे.

शरद पवार गटाला नावं मिळालं पण ‘वटवृक्ष’ चिन्हाचं काय? EC ने निर्णय राखून ठेवला

अमोल मिटकरी म्हणाले, पक्ष, चिन्ह आम्हाला मिळणारचं असं आम्ही सांगत होतो. वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर पक्ष कार्यालय ताब्यात घेणार आहोत. चिन्ह पक्ष मिळालं याचं समाधान, कार्यालय ताब्यात घेण्याबाबत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करणार आहोत. अद्याप प्रदेश कार्यालयाबाबत काही आदेश आलेले नाही. वरिष्ठ नेते काल नव्हते उपस्थित नव्हते, अपसूकच कार्यालय आमच्याकडे येईल, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

‘मविआसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा नाहीच’; आंबेडकरांनी खरं सांगून टाकलं

तसेच यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी टीका करणाऱ्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, सोशल मीडियावर कोणी काहीही ट्रेंड करतात. सोशल मीडियावर ट्रोल करणारी टीम प्रत्येक पक्षाकडे असते. जुने व्हिडिओ फिरवले तर त्याला काही अर्थ नाही. कोण काय म्हणत याकडं आम्ही दुर्लक्ष करु जनतेच्या कामासाठी आम्ही निर्णय घेतलायं. हे दादांंच स्वप्न् पूर्ण करु ट्रोलर्स त्यांचं काम करतील, असं मिटकरींनी स्पष्ट केलं आहे.

Lagna kallol Movie: मयुरी-सिद्धार्थ-भूषणचा ‘लग्नकल्लोळ’मधील ‘सनई संग’ गीत प्रदर्शित

…अन्यथा राज ठाकरेंनी हिमालयात जावं
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे. यासंदर्भातील राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. त्यावर अमोल मिटकरींनी सडकून टीका केलीयं. ते म्हणाले राज ठाकरेंकडे एक आमदार आहे. त्यांच्यासोबत त्यांनी चांगल रहावं नाहीतर त्यांच्यावरही ती पाळी येऊ शकते. त्यांच्याकडे एकच आमदार आहे, तो म्हणाला पक्ष माझा आहे जर निवडणूक आयोगाने निकाल दिला तर राज ठाकरेंनी वैराग्य प्राप्त करुन हिमालयात जावं
आपलं दुकान किती उंदरांनी पोखरलं ते बघा दुसऱ्यांचं फासे मोजू नका, या शब्दांत मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

follow us