Download App

World cup जिंकली टीम इंडिया..अन् अभिनंदनाचा ठराव आशिष शेलार यांच्यासाठी…

टी20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला मात्र, विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासाठी होत असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. या ठरावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

Aashish Shelar : एकीकडे टी20 वर्ल्ड कपावर भारतीय संघाने आपलं नाव कोरलेलं असतानाच दुसरीकडे भाजपचे आमदार आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांच्या अभिनंदनाचा ठराव विधान परिषदेत मांडण्यात आला. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी हा ठराव मांडलायं. लाड यांनी ठराव मांडताच विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. यावरुन विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. वाद सुरु असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी सूचना करुनही विरोधकांसह सत्ताधारी ऐकत नसल्याचं दिसून आलं.

पंकजा मुंडे, खोत, फुके यांच्यासह पाच जणांना विधानपरिषदेची उमेदवारी, BJP चे सोशल इंजिनिअरिंग जोरात

भारतीय संघाने तब्बल 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी भारतीय संघासह बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडला. लाड म्हणाले, 17 वर्षानंतर टी20 वर्ल्ड कप जिंकला असून भारतीय संघाचं अभिनंदन केलंच पाहिजे त्यासोबत हा अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयला पाठवायला हवा, मात्र, आपल्या विधिमंडळातील आमदार आशिष शेलार बीसीसीआयचे हे खजिनदार आहेत त्यांचंही अभिनंदन या सभागृहात केलं पाहिजे, असा प्रस्ताव लाड यांनी मांडला.

विधिमंडळात भारतीय संघाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाबद्दल विरोधकांनी चिकार शब्द नाही काढला मात्र, आशिष शेलार यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावार बोट ठेवत विरोधकांनी एकच सूर लावलायं. यामध्ये काँग्रेसचे आमदार भाई जगताप, ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्यासह इतर आमदारांनी कडाडून विरोध दर्शवला. यावेळी सभागृहात एकच गोंधळ सुरु असल्याचं दिसून आलं. गोंधळ होत असल्याने उपसभापती निलम गोऱ्हे यांनी बेल वाजवत सत्ताधारी आमदारांना सूचना दिल्या मात्र, विरोधकांच्या बरोबरीने सत्ताधारी आमदारही चोख प्रत्युत्तर देत असल्याचं दिसून आलं. यामध्ये आमदार प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांनी प्रत्युत्तर दिलंय.

पुण्यात नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; बनावट पोलिसाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक

प्रस्तावावर काय म्हणाले सत्ताधारी आमदार?
विरोधकांकडून गोंधळ सुरु असतानाच आमदार प्रविण दरेकर यांनी उभं राहत लाड यांनी जी भूमिका मांडली त्यावरुन एवढं अंगावर येण्याची गरज नाही. आशिष शेलार बीसीसआयचं काम करतात, सभाृहात सभासदाला बोलायचा अधिकार नाही का? काय बोलायंच हे विरोधकांनी ठरवावे का? याआधीही अभिनंदन केलेलं आहेत. तुम्ही रेकॉर्ड तपासून पाहा.. विरोधकांना एवढा आरडा ओरडा करण्याची गरजच नसल्याचं दरेकरांनी स्पष्ट केलंय.

प्रविण दरेकर यांच्यापाठोपाठ आमदार चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत विरोधकांना गप्पगार केल्याचं दिसून आलं. ते म्हणाले, राज्याच्या राजकारणाचा स्तर एवढा खाली गेलायं का? आपला सहकारी खजिनदार असेल तर त्याचं अभिनंदन करायला पाहिजे ते करण्यात कोणता खालीपणा आलायं. विधानभवनाचा सदस्य जर पदाधिकारी असेल तर अभिनंदन करण्यात कोणता खालीपणा? असा सवाल चंद्रकात पाटलांनी केलायं.

दरम्यान, आमदार प्रसाद लाड यांच्याकडून अभिनंदनाच्या ठरावाची सूचना आलीयं, या सुचनेनंतर गटनेत्यांसोबत बैठक घेऊन त्यावर कोणाचं नाव प्रस्तावात घ्यायचं याचा अंतिम निर्णय उपसभापतींचा आहे. अद्याप मी त्यावर निर्णय घेतला नसल्याचं उपसभापती निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंयं.

follow us