Download App

Video : पुण्यात भीषण अपघात; स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी जखमी; उपायुक्त पिंगळेंनी दिली माहिती

पुण्यातील सदाशिव पेठेत भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्य प्राशन केलेले असताना चालक गाडी चालवत होता हे समोर आलं आहे.

Drink and drive accident in Pune : पुण्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. (Accident) येथील भावे हायस्कूलजवळ एका कारनं 7-8 विद्यार्थ्यांना उडवलं आहे. एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारनं उडवल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यातील भावे हायस्कूल जवळ हा भीषण अपघात घडला आहे. भावे हायस्कूल जवळ एक चहाचं दुकान आहे, या दुकानाजवळ दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा अपघात घडाला आहे. कार चालकानं बारा जणांना उडवलं आहे, ज्यांचा अपघात झाला ते सर्व एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे, या घटनेतील काही जखमींना स्थानिकांच्या मदतीनं संचेती तर काही जणांना मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आता खूप होतयं, कोकाटेंचा निर्णय घ्याच; रोहित पवारांची दादा अन् फडणवीसांकडे थेट मागणी

हा अपघात नेमका कसा घडला? याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जेव्हा अपघात घडला तेव्हा या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता, त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटून वाहनाच्या अ‍ॅक्सिलेटरवर दाब पडला, त्यामुळे कारचं स्पीड अचानक वाढलं, अनियंत्रित झालेल्या कारने या चहाच्या दुकानसमोर पार्क केलेल्या गाड्या आणि तिथे असलेल्या लोकांना धडक दिली. या अपघातामध्ये एकूण बारा जण जखमी झालेत.

या घटनेनंतर आरोपी चालक जयराम मुळे वय 27, बिबवेवाडी, या वाहनाचा मालक दिंगबर यादव शिंदे वय 27 आणि सहप्रवासी राहुल गोसावी वय 27 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामध्ये कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त नाहीये. अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

 

follow us