Video: मोठी दुर्घटना! सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यातील बावधनमध्ये कोसळलं

हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. बावधनमधील केके बिल्डरच्या येथे घडली.

Video: मोठी दुर्घटना! पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा दुर्दैवी अंत, बचावकार्य सुरू

Video: मोठी दुर्घटना! पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा दुर्दैवी अंत, बचावकार्य सुरू

Helicopter Crashed In Pune : बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. गिरीशकुमार पिलाई आणि प्रीतमचंद भारद्वाज अशी मृतांची नावं आहेत. बावधनमधील केके बिल्डरच्या डोंगरावरची ही घटना आहे. पिंपरी चिंचवड पोलीय नियंत्रण  कक्षाला याबाबत फोन आला होता. त्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, काल याच हेलिकॉप्टरने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे परळी येथून पुण्यात आले होते. (Helicopter ) त्यानंतर हे हेलिकॉप्टर पुण्यात थांबले, तर तटकरे आणि अन्य नेते विमानाने मुंबईकडे रवाना झाले. आज हे हेलिकॉप्टर मुंबईला जाऊन तटकरे यांना घेऊन रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते.

प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी पावणेसात वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर होता. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा अपघात नेमका कसा घडला, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. हा परिसर पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर आहे.

आज महात्मा गांधी जयंती! कोसो दूर अहिंसेची पाऊलवाट चालणारे बापू; काय होते जगण्याचे विचार?

याठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, हा भाग डोंगराळ असल्याने येथे धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काऊंटी आणि एच.ई.एम.आर. एल. संस्था यामध्ये जो निर्मनुष्य परिसर आहे, तेथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे.

हिंजवडी पोलीसांच्या कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचलं. मात्र, या भीषण अपघातामध्ये वैमानिकासह हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू झाला. येथील रिसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात. त्यांना पुण्यातून थेट रिसॉर्टमध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आलं आहे. हे रिसॉर्ट मुळशीपासून काही अंतरावर आहे. पुणे-बंगळुरु महामार्गही येथून काही अंतरावरच आहे. काही दिवसांपूर्वी मुळशी भागातही एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. मात्र, त्यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

Exit mobile version