Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन मेळावा पुण्यात (Ahilyanagar News) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास पक्षातील आमदार, खासदार, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही हजर होते. मेळाव्यात त्यांचं भाषण विशेष ठरलं. कारण त्यांनी याच कार्यक्रमात मला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती शरद पवारांना केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याय भुवया उंचावल्या.
तर दुसरीकडे जयंत पाटील (Jayant Patil) यांचेच भाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांची गैरहजेरी चर्चेची ठरली. मामा जबाबदारीतून मुक्त होण्याची भाषा करतात तर भाचा थेट कार्यक्रमाला दांडीच मारतो. म्हणजे, मामा-भाच्याच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हजर नव्हते. राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांना मानणारा एक गट निर्माण झाला. तर दुसरीकडे अजित पवार यांचा (Ajit Pawar) एक गट सत्तेमध्ये सहभागी झाला. आज राष्ट्रवादीचा वर्धापनदिन साजरा होतो आहे. यासाठी आज राज्यभरातून कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पुणे येथे जमा झाले आहेत. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र एकीकडे राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असे असतांना मात्र पक्षातील दोघेजण दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
“आता तीन महिने फक्त निवडणूक, 50 टक्के महिलांनाच निवडून द्या”, शरद पवारांनी क्लिअर सांगितलं
पुण्यातील बालगंधर्व सभागृहात मेळाव्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे सूतोवाच केले. जवळपास सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. 9 जानेवारी 2025 रोजी जयंत पाटील यांनी थोडे दिवस थांबा राजीनामा देणार असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा मला या जबाबदारीतून मोकळं करा म्हणत राजीनामा देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पाटील व भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे जयंत पाटील हे भाजप वाटेवर असल्याच्या चर्चा आहे.
जयंत पाटील यांचे भाचे तसेच राहुरीचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज पक्षाच्या वर्धापनदिनाला दांडी मारली. एकीकडे सगळे नेते पदाधिकारी यांनी कार्य्रक्रमस्थळी जमा झाले. तर तनपुरे यांची गैरहजेरी यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान तनपुरे हे भाजप वाट्यावर असल्याच्या चर्चा आहे. त्यांनी लेट्सअप मराठीशी मुलाखतीमध्ये बोलताना एक सूचक भाष्य देखील केले होते.
राज्यात सत्ताधारी पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. यातच राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर आहे अशा चर्चा आहे. यावर खुद्द तनपुरे यांनी मोठे वक्तव्य केले होते. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय चालले आहे हे आधी पाहू त्यानुसार योग्य निर्णय होईल. तसेच राजकारणात सगळेच पत्ते उघडून दाखवायचे नसतात. योग्य वेळी योग्य निर्णय होईल असे सूचक वक्तव्य माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता; जोरदार भाषण करत लंकेंनी बालगंधर्व रंगमंदीर गाजवलं