साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता; जोरदार भाषण करत लंकेंनी बालगंधर्व रंगमंदीर गाजवलं

  • Written By: Published:
साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता; जोरदार भाषण करत लंकेंनी बालगंधर्व रंगमंदीर गाजवलं

Nilesh Lanke Speech In NCP Vardhapan Din : साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता. लंके कार्यकर्ता माझा आहे. तो लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवतो. त्याला जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण असे सांगितले होते. त्यानंतर तो व्यक्ती महिनाभर झोपला नसेल असे सांगताच बालगंधर्व रंगमंदीरात उपस्थितांनामध्ये एकच हशा पिकला. पवार समजले नाहीत म्हणून ५५ वर्ष राजकारणात पुरून उरले. रावणाचासुद्धा काळ संपला आशावादी रहा. दिवस बदलत असतात..संघर्षाची तयारी ठेवा..नैराश्य आलं तर, पवारांचा जीवनपट पाहा असे म्हणत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील शरद पवारांच्या पक्षाचा वर्धापनदिन सोहळा गाजवला.

सत्ता जाताच… मुंगळे पळाले, रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली

आम्हाला हात जोडता येतो अन बाह्या मागे सारता येतात

पुढे उपस्थितांना संबोधित करताना लंके म्हणाले की, साहेब अधिकारी ऐकत नाही तर बाह्या वर करा ना, स्वतःसाठी जगतो तो काय कार्यकर्ता नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी जनतेला आवाहन केले की, “लढा तुम्ही जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.”आम्हाला हात जोडता येतो अन बाह्याही मागे सारता येतात. जनतेसाठी लढलं पाहिजे असे म्हणत रात्री बारानंतर जो कार्यकर्ते सांभाळतो तो खरा साहेबांचा कार्यकर्ता आहे.

ब्रेकिंग : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा; दमदार भाषण केल्यानंतर जयंतरावांचे राजीनाम्याचे संकेत

पवार साहेब दम देत नाहीत, आम्हाला तर कायम दचका देतात

दूरदृष्टी असणारा आपला नेता अजून काय हवं असे सांगत वाटलं नव्हतं आमदार होईल. ज्यावेळी मी आमदार झालो त्यावेळी चिमटा घेऊन चेक केलं खरच झालो काय असा किस्साही लंके यांनी यावेळी सांगितलं. धीर धरा काहींना लय घाई झाली. थांबाना जरा आपला नेता आहे. आपण हाफ चड्डीत होतो तेव्हा ते देशात राजकारणात होते असे म्हणत लंकेंनी पवारांच्या (Sharad Pawar)  राजकारणाचे गोडवे गायले.

सुप्रिया सुळेंचं स्टेटस…राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या पठ्ठ्याने केला मोठा खुलासा

“आपला नेता लै मोठा आहे, स्वतःसाठी जगले नाहीत, अनेकांना खुर्चीवर बसवले.” ते पुढे म्हणाले, “एवढा मोठा नेता आहे, आपण लहान होतो तेव्हा नेता देश चालवतो. ज्याची त्याची स्टाईल असते. पवार साहेब दम देत नाहीत, आम्हाला तर कायम दचका देतात. पवार साहेब कोणाला समजले नाहीत म्हणूनच ५५ वर्षे देशाच्या राजकारणात टिकून राहिले आहेत.

साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही तर…

साहेब तुम्हाला कळाले तर, लोटांगण घालेन. हे समजलं नाही म्हणून तर देशाच्या राजकारणात ५५ वर्ष टिकून राहिलेला नेता आहे. हे सोप्प नाही. सगळी गणितं समजून घ्यावी, साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही तर, आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून काम करावं, असंही मिश्कीलपणे लंके म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube