Ajit Pawar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल (MLA Disqualification Case)देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) मात्र संतापल्याचे दिसून आले. अजित पवार काल पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. मात्र अजित पवार या प्रश्नावर चांगलेच संतापले. या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं अभिनंदन केलं का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर मला फुकटचे सल्ले देऊ नये, असे अजित पवार म्हणाले.
Disqualification Mla : विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंगच; निकालावर राऊतांचा गंभीर आरोप
दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना ग्राह्य धरण्यात आली. यावर देखील तारीख नव्हती. निवडणूक आयोगाकडे 1999 सालच्या घटनेची प्रत होती. त्यामुळे 2018 साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरण्यात आले नाहीत, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालात म्हटलं आहे. नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या याचिका फेटाळात शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरविण्याचा निकाल दिला.
राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, निर्ण जसा तुम्ही ऐकला तसाच मीही ऐकला. न्यायाधीशांनी जो निर्णय दिला तो योग्यच आहे. निकालानंतर मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं का. असा प्रश्न विचारल्यावर मात्र अजित पवार संतापलेच. एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन कधी करायचं हे मी ठरवेन. मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पत्रकारांनी पडू नये, असे अजित पवार म्हणाले.
Rahul Narvekar : भाजपमध्ये स्थिरावलेल्या राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास | LetsUpp Marathi
माझा स्वभाव सरळ आहे. पण, तुम्ही एखाद्याचं नाव घेऊन प्रतिक्रिया विचारता. मुळात कोण काय करतं काय बोलतं याच्याशी मला देणंघेणं नाही. त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेले असते. मी माझे मत व्यक्त करण्यासाठी बसलो आहे, असेही अजित पवार म्हणाले. आता आपल्याकडे वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. प्रत्येकवेळी वाचाळवीर काहीतरी बोलतात. त्या प्रत्येकाला उत्तर देणे माझे काम नाही. मला मिळालेल्या संधीचा उपयोग करून मी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देतो, असेही अजित पवार म्हणाले.